Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ब्रह्मास्त्र'च्या टीमला अमिताभ बच्चन यांनी दिली 'खास' पार्टी

आगामी सिनेमा ब्रह्मास्त्र ची संपूर्ण टीम सध्या बुल्गारियात शूटिंग करत आहे.

'ब्रह्मास्त्र'च्या टीमला अमिताभ बच्चन यांनी दिली 'खास' पार्टी

मुंबई : आगामी सिनेमा ब्रह्मास्त्र ची संपूर्ण टीम सध्या बुल्गारियात शूटिंग करत आहे. या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चनने संपूर्ण टीमला समोसा पार्टी दिली. या पार्टीच्या निमित्ताने बीग बींनी खास ट्वीटही केले. त्यात त्यांनी लिहिले की, बुल्गारियाच्या सोफियात ब्रह्मास्त्र ची संपूर्ण टीमला वडापाव आणि समोसा खायला घालणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.

वेक अप सिड आणि ये जवानी है दिवानी यांसारख्या सिनेमांमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात अमिताभ आणि रणबीरशिवाय आलिया भट्ट आणि नागार्जुन प्रमुख भूमिकेत आहेत. 

आलिया-रणबीर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहेत. ब्रह्मास्त्र सिनेमाचा पहिला भाग १५ ऑगस्टला प्रदर्शित होईल. 

सुत्रांनुसार, नागार्जुन दीर्घ काळापासून हिंदी सिनेमात कमबॅक करण्याचे प्लॅनिंग करत होता. पण योग्य भूमिका न मिळाल्यामुळे सिनेमात येण्यासाठी काहीसा अवधी लागला. 

Read More