Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना

Bollywood news : बॉलिवूड सुपरस्टार अमिर खानच्या लेकीच्या लग्नाची चर्चा सगळीकडे होत आहे. अमिर खानची लाडकी लेक ईरा खान आणि नुपूर शिखरे 3 जानेवारी म्हणजेच आज लग्न बंधनात अडकणार आहेत. आज 6च्या सुमारास मुंबईतील ताज लॅंडमध्ये ईरा आणि नुपूर रजिस्टर लग्न करणार  आहेत. 

लग्नात गिफ्ट घेऊन येणाऱ्यांसाठी आमिर खानच्या लेकीच्या विशेष सूचना

Amir khan :सुप्रसिद्ध अभिनेता अमिर खानची लेक आज लग्नबंधनात अडकणार आहे. इरा खान ही महाराष्ट्राची सुन होणार आहे. नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधनार आहे. सोशल  मिडियावर या दोघांच्या  लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अमिर खानच्या घरातील लग्नाची गडबड , लेकीचे केळवण या सर्व गोष्टींमध्ये खान कुटूंब व्यस्त आहे. आज ईरा खान आणि नुपूर शिखरे रजिस्टर लग्न करणार आहेत. हा विवाहसोहळा मुंबईतील ताज लॅंड  मध्ये पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी अनेक कलाकार मंडळी हजेरी लावणार आहेत. 
अमिर खानच्या लेकीचा हा विवाह सोहळा आता वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आला आहे.

लग्न संमारंभात नव्या जोडप्यांना शुभ आशीर्वाद म्हणुन भेटवस्तू दिली जाते , ईरा खान ही प्रथा मोडणार आहे. इरा खान ही पाहुण्यांनी लग्नात आणलेला आहेर घेणार नसल्याचं समोर आलं आहे. ईरा खान सांगते की 'लग्नामध्ये भेटवस्तू देण्यापेक्षा ते एखाद्या संस्थेला किंवा एनजीओ ला दान करा.' ईरा खान ही सामाजिक संस्थेसाठी काम करते. 
 ईरा खानच्या या निर्णयाचं सगळीकडे कौतुक होत आहे. 
 
ईरा खान आणि नूपुर शिखरे ही दोघं रजिस्टर लग्नानंतर जयपुर मध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने पुन्हा लग्न करणार आहेत. या विवीह सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. 

Read More