Marathi News> मनोरंजन
Advertisement

स्वतःचाच चित्रपट पाहून का आले आमीरला रडू?.. हे पाहून नेटकऱ्यांनी केले आमीर खानला जबरदस्त ट्रोल

सगळीकडे या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

स्वतःचाच चित्रपट पाहून का आले आमीरला रडू?.. हे पाहून नेटकऱ्यांनी केले आमीर खानला जबरदस्त ट्रोल

Laal Singh Chaddha: मिस्टर पर्फेक्टेशनिस्ट आमीर खान आणि अभिनेत्री करिना कपूर हिचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सगळीकडे या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट हॉलीवूडचा रिमेक असून 1994 साली प्रदर्शित झालेल्या the forest gump या चित्रपटाचा लाल सिंग चढ्ढा चित्रपट हिंदी व्हर्जन आहे. गेले अनेक दिवस हा चित्रपट टाळेबंदीमुळे प्रदर्शनापासून दूर राहिला होता त्यामुळे चार वेळी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलण्यात आली होती. 

आता हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे त्यामुळे प्रेक्षकांना आता या चित्रपटासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये. परंतु हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नव्हता. तेव्हा ट्रेलरमधील आमीर खानचा अभिनय पाहून त्याला नेटकऱ्यांनी खूपच ट्रोल केले आहे. अजूनही आमीर खान त्याच्या थ्री ईडियट्सच्या भुमिकेतून बाहेर आलेला नाही अशी टिकाही त्याच्यावर केली गेली. 

परंतु आता आमीर खान एका वेगळ्याच कारणसाठी ट्रोल होत आहे, या ट्रोलिंगचे निमित्त जरी लाल सिंग चढ्ढाचे असले तरी आमीरला पुन्हा एकदा नेटिझन्सनी त्यांच्या निशाण्यावर घेतले आहे. आमीर खानचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे त्या फोटोत तो आपलाच चित्रपट लाल सिंग चढ्ढा पाहूनच रडताना दिसत आहे. हा चित्रपट पाहताना आमीर आपल्या टीशर्टलाच डोळे पुसताना दिसतो आहे. 

हे पाहून मात्र नेटकऱ्यांनी आमीरला प्रचंड ट्रोल केले आहे. एका यूजरने लिहिले, "करीना कपूर त्याचा तोच अभिनय आणि तोच एक्सप्रेशन पाहताना झोपून गेली आहे." दुसर्‍या युजरने लिहिले, “पण बेबो का झोपत आहे? इतना कंटाळवाणा चित्रपट आहे का?"तिसऱ्या वापरकर्त्याने ट्विट केले, “भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वात ओव्हररेट अभिनेता म्हणजे आमीर खान. त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका इतर कोणत्याही अभिनेत्याने सहज साकारली आहे. त्यात विशेष काय?" एकाने लिहिले, "आमिर खान लाल सिंग चड्ढाला पाहताना रडत आहे जणू त्याने मूळ फॉरेस्ट गंप पाहिलेलाच नाही". तर दुसऱ्या युझरने लिहिले की “लवकरच आमिर खान 90 च्या दशकातील स्वतःच्या चित्रपटांचे रिमेक बनवणार आहे”.

Read More