Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने केली कास्टिंग काऊच 3 ची घोषणा

रटाळ मालिकांना कंटाळलेल्या आणि टेलिव्हिजनपासून दूर गेलेल्या अनेक मराठी तरूणांना 'कास्टिंग काऊच' या वेब शोने पुन्हा मराठी एंटरटेनमेंटकडे परत आणले. 

अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीने केली कास्टिंग काऊच 3 ची घोषणा

मुंबई : रटाळ मालिकांना कंटाळलेल्या आणि टेलिव्हिजनपासून दूर गेलेल्या अनेक मराठी तरूणांना 'कास्टिंग काऊच' या वेब शोने पुन्हा मराठी एंटरटेनमेंटकडे परत आणले. 

 'कास्टिंग काऊच' या वेबशोने गेल्या वर्षभरात इंटरनेटवर खूपच धुमाकूळ घातला होता. अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेता, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या जोडजोळीने त्यांच्या खास 'पुणेरी' अंदाजामध्ये रसिकांना वेबवरही खिळवून ठेवले.  

 तिसर्‍या सीझनची घोषणा  

 दोन यशस्वी सीझननंतर अमेय आणि निपुण हे दोघेही चित्रपटामध्ये  आणि त्यांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले होते. गेल्या वर्षभरात अमेयने फास्टर फेणे आणि मुरांबा हे दोन सुपरहीट सिनेमे दिले. तर निपुणचा 'बापजन्म' या दिगदर्शित केलेला चित्रपट रसिकांच्या भेटीला आला. मात्र लवकरच वेबवर अमेय आणि निपुण पुन्हा एकत्र दिसणार आहे.   

 कास्टिंग काऊच पुन्हा येणार 

 सेलिब्रिटींची मुलाखत घेण्याच्या हटके अंदाजात 'कास्टिंग काऊच' ची थीम  डिझाईन करण्यात आली आहे. कास्टिंग काऊचवर पुन्हा निपुण आणि अमेय दिसणार आहेत. फेब्रुवारीचा अंतिम आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात 'कास्टिंग काऊच' पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा अमेय आणि निपुणने फेसबुकवर केली आहे.   

 भारतीय डिजिटल पार्टीचे लाखभर सब्सक्रायबर्स  

 भाडीपा या मराठमोळ्या युट्युब चॅनेलने काल ( 7 फेब्रुवारी) लाखभर सब्सक्रायबर्स पूर्ण झाले आहेत. 'कास्टिंग काऊच'चा तिसरा सीझन लवकरच येणार असला तरीही हा शेवटचा सीझन असल्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. यापूर्वी मराठी आणि हिंंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आता तिसर्‍या सीझनमध्ये कोण येणार ? याकडे चाहत्यांंंंंचे लक्ष लागले आहे.

Read More