Marathi News> मनोरंजन
Advertisement

ब्रेकअप झालेल्या भावाचं अभिनेत्रीकडून सांत्वन

राग विसरून भावाच्या मदतीला धावून आली बहिण

ब्रेकअप झालेल्या भावाचं अभिनेत्रीकडून सांत्वन

मुंबई : अभिनेत्री अमीषा पटेल आणि तिचा भाऊ अभिनेता अश्मित पटेल यांचा बरेच काळापासून अबोला होता. कौटुंबिक कारणामुळे बहिण-भावांनी एकमेकांशी बोलणं टाकलं होतं. मात्र ब्रेकअपनंतर एकटा पडलेल्या भावाला हिम्मत देण्यासाठी अमिषा राग विसरून भेटीला गेली आहे. 

महक चहलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमीषा आणि अश्मितमध्ये पॅचअप झालं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी पालकांनी या दोघांमधील वाद मिटवला असून नवीन सुरूवात करण्यासाठी सांगितलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर महक आणि अश्मितने काही दिवसांपूर्वी साखरपुडा मोडला आहे. यामुळे अश्मित नाराज झाला आहे. एकटा पडलेल्या भावाला मानसिक आधार देण्यासाठी अमीषा पोहोचली आहे. 

2004 मध्ये अमीषाने वडिल अमित पटेल विरोधात तक्रार दाखल केली होती. अमीषाने कमावलेले पैसे वडिलांनी खर्च केले. यावेळी अश्मितने आपल्या कुटुंबाची बाजू घेतली होती. यानंतर अमीषा देखील बॉयफ्रेंड विक्रमसोबत राहू लागली होती. 

2008 मध्ये विक्रमसोबत नातं तुटल्यानंतर अमीषाने कुटुंबासोबत पुन्हा जुळवून घेतलं. मात्र 2007 मध्ये अमीषा आणि अश्मितसोबत पु्न्हा वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत बोलणं बंद केलं. पण आता दोघं पुन्हा एकत्र आल्याचं समजतंय. 

Read More