Marathi News> मनोरंजन
Advertisement

'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

Ameesha Patel : अमीषा पटेलनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या वयावरुन कॉमेडियननं तिची खिल्ली उडवली. 

'आधी केलं प्रपोज, मग वयावरुन उडवली खिल्ली!' अभिनेत्रीनं दिलं असं उत्तर

Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटले ही 'गदर 2' नंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यानंतर अमीषा अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, नुकत्याच एका कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात कॉमेडियन आधी अमीषाला प्रपोज करतो त्यानंतर वयावरून तिला ट्रोल करतो. 
 
या कार्यक्रमाचं नाव मॅडनेस मचाएंगे असं आहे. तर या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या शोमध्ये असलेला कॉमेडियन हर्ष गुजराल या आहे. आगामी एपिसोडमध्ये अमीषा पटेल आणि उर्फी जावेद आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सुरुवातीला तो उर्फीची मस्करी करतो आणि नंतर अमीषाकडे लग्नाची मागणी घालतो. यावेळी व्हिडीओत दिसतंय की हर्ष सुरुवातीला बोलतो की "घरी माझी काही इज्जतचं नाही. भाज्यांना जास्त इज्जत असते." यावर अमीषा बोलते की "भाज्यांची इज्जत आहे तर मूर्खाची इज्जत का नाही?" त्यावर हर्ष बोलतो की "आईला विचारतो की मूर्खाची इज्जत का नाही. तेव्हा आई म्हणाली की कोणी मूर्ख मुलगी येईल ती करेल."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर हर्ष अमीषाला लग्न करण्यासाठी प्रपोज करतो आणि म्हणतो "जर तिनं होकार दिला तर तो लगेच 'कहो ना प्यार है 2' आणि 'गदर 3' ची घोषणा करेल." त्यानं हे देखील म्हटलं की "ज्या प्रकारे  'कहो ना प्यार है' मध्ये हृतिक परत तिच्याकडे आला, तसं हा परत येणार नाही." त्यावर अमीषा हसली आणि म्हणाली "माझ्यासाठी तर प्रत्येक मुलगा परत येतो. तर ती कोणावरही लवकर प्रेम करत नाही." अमीषाचं हे वक्तव्य ऐकताच हर्षनं तिच्या वयावर कमेंट केली. हर्ष म्हणाला "लवकर कर, तुझं वयं वाढत चाललं आहे आणि माझं पण."

हेही वाचा : 'ते मला हातोडीनं मारायचे...', लहाणपणी अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली होती वाईट वागणूक

इतकंच नाही हर्ष हा उर्फीवर अशीच कमेंट करतो. तर हर्षनं तिच्या कपड्यांवर कमेंट केली आहे. खरंतर त्यावेळी अनुप जलोटा आणि उर्फी एकत्र आले होते. त्यावेळी हर्ष अनुप यांना म्हणाला, "तुम्हाला जवळून पाहून आनंद झाला. उर्फीला तर मी अनेकदा झूम करुन पाहिलंय." त्यानंतर तो तिच्या कपड्यांवर देखील अशाच काही कमेंट करताना दिसतो. 

Read More