Marathi News> मनोरंजन
Advertisement

'या' पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री अमिषा पटेल?

'कहो ना प्यार है' आणि 'गदर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे.

'या' पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात आहे अभिनेत्री अमिषा पटेल?

मुंबई : 'कहो ना प्यार है' आणि 'गदर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. वास्तविक, व्हिडिओमध्ये अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या गाण्यावर अमिषा पाकिस्तानचा प्रसिद्ध अभिनेता इमरान अब्बाससोबत रोमँटिक होताना दिसली होती.

हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर अमिषा आणि इम्रानच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र येऊ लागल्या. लोकांना वाटलं की, 46 वर्षीय अमीषा पाकिस्तानच्या 39 वर्षीय इम्रानला डेट करत आहे. आता अमिषानेच यावर मौन तोडलं आहे.

अमिषा पटेलने व्हिडिओ मागचं सत्य सांगितलं
अलीकडेच गदर फेम अभिनेत्री अमिषा पटेलने एका मुलाखतीत इम्रानसोबतच्या अफेअरच्या अफवांवर मौन सोडलं आणि म्हणाली, 'मीही हे रिपोर्ट्स वाचले आहेत. मला खूप हसू आलं.ही सगळी बातमी फक्त मूर्खपणा आणि वेडेपणाने भरलेली आहे. इतक्या वर्षांनी मला माझा मित्र भेटलातो. हे फक्त एक चांगले बाँडिंग आहे.

त्यामुळे या अफेअरची बातमी पसरली
नुकतीच अभिनेत्री अमिषा पटेल एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बासही तिथे उपस्थित होता. अमीषाने तिथे इमरानसोबत एका गाण्यावर अभिनय केला आणि अभिनेत्रीने तिचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तेव्हापासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता अमिषाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. याशिवाय, अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती पुन्हा एकदा सनी देओलसोबत तिचा हिट चित्रपट 'गदर-एक प्रेम कथा', 'गदर 2' या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

Read More