Marathi News> मनोरंजन
Advertisement

अल्लू अर्जुनच्या लेकीची सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' मोठ्या चित्रपटात झळकणार!

तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटात करणार एन्ट्री

अल्लू अर्जुनच्या लेकीची सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' मोठ्या चित्रपटात झळकणार!

Allu Arjun Daughter : तेलगू सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) मागील अनेक वर्षापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. अल्लू अर्जुनने संपूर्ण भारतात तसेच जगभरात एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. 'पुष्पा - द राईज' (Pushpa) या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर अल्लू अर्जुनची ब्रँड व्हॅल्यूही वाढली. अशातच आता अल्लू अर्जुनच्या मुलीने देखील आता चित्रपटसृष्टीत एन्ट्री मारली आहे.

तेलगूमधील या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जाणारा 'शकुंतलम' (Shakuntalam) या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाच वर्षांची मुलगी अल्लू अरहा (Allu Araha) झळकणार आहे. हा सिनेमा 4 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. तेलगू सोबतच ते हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट येणार आहे.

चित्रपटात (Shakuntalam Movie) राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा राजकुमार भरत यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसणार आहे. अल्लू अरहा सोशल मीडियावर चाईल्ड सेलिब्रेटी आहे. 'शकुंतलम' हा सिनेमा VFX चा उत्तम नमुना असेल. सिनेमाच्या प्रोडक्शनसाठी तब्बल 10 महिन्याचा कालावधी लागला. शुक्रवारी सिनेमाचा मोशन पिच्चर रिलीज करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि त्याची मुलगी अरहासोबतचा (Allu Arjun Daughter Allu Araha) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अल्लू अर्जुन आपली मुलगी अरहासोबत गणपती विसर्जन करताना पहायला मिळाला होता.

Read More