Marathi News> मनोरंजन
Advertisement

'मला राहाला कपडे घालण्याआधी रणबीरला विचारावं लागतं'; आलिया भटने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) फार चांगला पिता असल्याचं कौतुक केलं आहे. तसंच मी नाही तर रणबीर कपूरच तिने कोणते कपडे घालावेत याचा निर्णय घेतो असं सांगितलं आहे.   

'मला राहाला कपडे घालण्याआधी रणबीरला विचारावं लागतं'; आलिया भटने केला खुलासा

पालकांमध्ये नेहमी आईच मुलांना कोणते कपडे घालायचे याचा निर्णय घेते तसंच तीच त्यांना ते कपडे घालते असा एक समज आहे. मात्र रणबीर कपूरने हे खोटं ठरवलं असल्याचं आलिया भटने सांगितलं आहे. घराबाहेर जाताना राहाने कोणते कपडे घालावेत याचा निर्णय रणबीर कपूर घेतो असा खुलासा आलिया भटने केला आहे. तसंच रणबीर कपूर राहासोबत अत्यंत गंमतीशीर गप्पा मारतो असंही तिने सांगितलं आहे. 

रणबीर कपूर आणि राहमधील संवाद तसंच त्याची पिता म्हणून भूमिका याबद्दल आलिया भटने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. तिने सांगितलं की, "मला एक गोष्ट माहिती नव्हती ती म्हणजे रणबीर कपूर राहाच्या फॅशन निवडीबद्दल किती स्पष्ट आहे. मला त्याला जाऊन आज राहाला कोणते कपडे घालायचे आहेत असं विचारावं लागतं? यानंतर तो येतो आणि वॉर्डड्रोबमधील सर्व कपडे काढतो. तो यामध्ये फार गांभीर्याने गुंतलेला असतो".

पुढे तिने सांगितलं की, "तुम्हाला वाटत असेल की मीच राहाला कपडे घालत असेन, पण मी हे सर्व रणबीर कपूरवर सोडलं आहे. तो फार उत्तमरित्या हे करतो". आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या घऱी 8 नोव्हेंबर 2022 ला राहाचं आगमन झालं. जन्मानंतर अखेर ख्रिसमसला रणबीर कपूरने राहाचा चेहरा उघड करत जगासमोर आणलं होतं. 

रणबीर एक उत्तम बाप होईल याबद्दल आपल्याला फार आत्मविश्वास होता असं आलिया भट म्हणाली आहे. तिने सांगितलं की, "त्या दोघांमधील जो बॉण्ड आहे तो फार गमतीशीर आहे. ते दोघे एकत्र असताना फार मजा येतो. ते दोघे नेहमी एकमेकाला चिडवत असतात, एकमेकाचा पाय ओढत असतात. त्यांच्यातील संवादही गमतीशीर असतो. ते एकमेकांना हसवत आनंदी ठेवत असतात".

नुकतंच आलियाने रणबीर कपूर आणि राहासोबत एक कँडीड फोटो शेअर केला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे तिघे फ्रेंच रिव्हिएरामध्ये होते. आलियाने फोटोला "कोणत्याही कॅप्शनची गरज नाही" असं कॅप्शन दिलं होतं. आलिया भट आता तिचा आगमी चित्रपट 'जिगरा' साठी शुटिंग करत आहे. वासन बाला दिग्दर्शित, हा चित्रपट सुरुवातीला सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता 11 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

Read More