Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलिया भट्ट जखमी

  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाचं शुटिंग करत आहे. 

'ब्रम्हास्त्र' च्या सेटवर आलिया भट्ट जखमी

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाचं शुटिंग करत आहे. 

नुकताच आलियाने आपला 26वा वाढदिवस साजरा केला. ब्रह्मास्त्रच्या शूटिंग दरम्यान आलियाला दुखापत झाली आहे. आलियाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. एका अॅक्शनचे शूट करत असताना हा अपघात घडला आहे. त्यामुळे काही काळासाठी आलियाला आता शूटिंग करता येणार नाही.

आलिया सध्या बल्गेरियामध्ये शूटिंग करते आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूरसुद्धा आहे. रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करतायेत. रणबीर आणि आलियासह यात मौनी रॉय सुद्धा दिसणार आहे. तिच्यासोबत बल्गेरियामध्ये रणबीर आणि मौनीसुद्धा आहेत.   

या चित्रपटासाठी रणबीर आणि आलिया अनेक दिवसांपासून मेहनत घेतायेत. दोघांनी यासाठी घोडेस्वारीचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात आपल्याला भरपूर अॅक्शन दिसणार आहे.   हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. रणबीरच्या रस्त्यात अडचणी टाकण्याचे काम करणार आहे.

Read More