Marathi News> मनोरंजन
Advertisement

बर्थडे स्पेशल : क्युटनेस आणि मेहनतीने जिंकली प्रेक्षकांची मने!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज २५ वा वाढदिवस आहे.

बर्थडे स्पेशल : क्युटनेस आणि मेहनतीने जिंकली प्रेक्षकांची मने!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज २५ वा वाढदिवस आहे. आलियाचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईत झाला. 'स्टुडेंट ऑफ द ईयर' या सिनेमातून तिने तिच्या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती. पहिल्या सिनेमातील तिचा अभिनय प्रेक्षकांना फारसा भावला नव्हता. मात्र त्यानंतर तिने आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले. बॉलिवूडमध्ये ६ वर्ष पूर्ण झालेल्या तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

विविध भूमिकांमध्ये दिसली

'स्टुडेंट ऑफ द ईयर' नंतर आलिया हायवे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. त्यात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर  '2 स्टेट्स' मधील भूमिका तिने आपल्या बहारदार अभिनयाने फार सुरेख निभावली. त्यानंतर अशा वेगवेगळ्या भूमिका तिने साकारल्या.

असा साजरा करणार वाढदिवस

मात्र जनरल नॉलेजवरून ती अनेकदा ट्रोल होते. सोशल मीडियावर तिेचे किस्से चांगलेच रंगतात. मात्र यामुळे तिने स्वतः आत्मविश्वास गमावला नाही. लवकरच ती ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहे. सध्या ती बुलगारिया या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सेटवरच ती तिचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे कळतेय.

Read More