Marathi News> मनोरंजन
Advertisement

राहुल आणि प्रियंका गांधींच्या 'त्या' निर्णयावर अलंकृता श्रीवास्तव यांची प्रतिक्रिया

हाथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार आणि हत्येमुळे देशभरात वातावरण चांगलेच तापले आहे.   

राहुल आणि प्रियंका गांधींच्या 'त्या' निर्णयावर अलंकृता श्रीवास्तव यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण देशभरात वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, कोणत्याही प्रकारची ताकद आम्हाला शांत करू शकत नाही. यावर फिल्ममेकर अलंकृता श्रीवास्तव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रियंका आणि राहुल यांच्या या निर्णयाचे अलंकृताने खूप कौतुक केले आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा एक फोटो शेअर करत अलंकृता श्रीवास्तव यांनी 'तुम्ही माझं मन जिंकलात...' असं कॅप्शन दिलं आहे.  

अलंकृता श्रीवास्तव यांनी पुढे असं म्हटलं, 'प्रियंका गांधी तुम्ही मोठ्या मनाच्या आहात. भारताला करुणा आणि दयाळूपणाची खरचं गरज आहे.' त्यांच्या या ट्विटवर आता नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अलंकृता यांनी पीडितेच्या आईला मिठी मारताना एक भावूक फोटो शेअर केला आहे. 

उत्तर प्रदेशात हाथरस (Hathras gangrape) इथे अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत झाला. हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून केला जात आहे. तसेच सोशल मीडियावरून नागरिकांचा आक्रोश दिसून येत आहे. दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तरुणीने अखेरचा श्वास घेतला.

Read More