Marathi News> मनोरंजन
Advertisement

गळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमारला पाहून चाहते गोंधळले

Akshay Kumar Tattoo Photo: सध्या अक्षय कुमार हा अभिनेता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो उत्तराखंडमध्ये (Akshay Kumar at Uttarakhand) फिरताना दिसतो आहे. यावेळी त्यानं गळ्यात माळ अन् आपल्या टॅटूचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या फोटोची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. 

गळ्यात माळ अन् टॅटू, शर्टलेस फोटोत खिलाडी कुमारला पाहून चाहते गोंधळले

Akshay Kumar Tattoo: अभिनेता अक्षय कुमार हा कायमच या ना त्या कारणासाठी चर्चेत असतो. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा होताना (Akshay Kumar News) दिसते. गेल्या वर्षी अक्षयचे एकाहून एक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे गेल्या वर्षी अक्षय कुमारची चांगलीच चर्चा रंगली होती. अक्षय हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो इन्टाग्रामवरही आपले वैयक्तिक आणि प्रोफेशनल फोटोही अनेकदा शेअर करत असतो. सध्या त्याच्या अशाच एका फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्यानं आपला टॅटू फ्लॉन्ट केला आहे. या टॅटूची प्रचंड चर्चा आहे. 

यावेळी त्यानं शर्टलेस फोटो (Akshay Kumar Shirtless Photo) शेअर केला आहे. परंतु यावेळी त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी नानाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे अक्षय कुमार ट्रोल झाला आहे. परंतु हा फोटो नक्की आहे तरी काय? या फोटोमध्ये अक्षय कुमारनं शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. त्यानं गळ्यात एक माळ घातली आहे आणि त्याच्या पाठीमागे त्यानं एक टॅटू काढला आहे ज्यात त्यानं त्याच्या मुलाचं म्हणजेच आरवचं नावं लिहिलं आहे. त्यानं हा त्याचा फोटो पाठमोरा पोस्ट केला आहे. परंतु काहींनी काहीतरी वेगळ्याच कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा  - 'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्यानं गाठले कोट्यवधींचे आकाडे; एकाच इंडस्ट्रीत असून सख्खा भाऊ मात्र करतोय संघर्ष

एका युझरनं ''हा आरव कोण आहे?'' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''अक्की सर आरव सोबत नितारा हे नावंही असायला हवं. आत्ता हे नावं अपुर्ण वाटतं आहे.'' तर एकानं लिहिलंय की, ''विमल तर घेऊन आहात ना सर?'' तर ज्यांचे नाव आरव आहे त्यांनी अक्षय कुमारनं खुद्द आपल्या नावाचा टॅटू काढला आहे हे पाहून त्याचे आभार मानले आहेत. तर अनेकांनी त्याच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. यावेळी या फोटोसह अक्षय कुमारनं लिहिलं आहे की, ''देवभूमीत एक सिनेमांचं शुटिंग पूर्ण केले आहे. मी आत्ता उत्तराखंडाच्या प्रेमात पडलोय.. पुन्हा उत्तराखंडला भेटण्याची इच्छा आहे. ज्यावर चाहत्यांनीही त्यांच्या या नव्या सिनेमाची उत्सुकता व्यक्त केली आहे.''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'सेल्फी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही फारशी कमाई केली नव्हती. त्यामुळे आता त्याच्या आगामी चित्रपटांची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता त्याचा 'बडे मिया आणि छोटे मिया' हा चित्रपट पर्दशित होणार आहे. त्याचसोबत सर्वात अवेटेड असा 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Read More