Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड

Ajay Devgav चा 'दृश्यम 2' प्रदर्शित झाला आहे. 

Ajay Devgn रचतोय विक्रमावर विक्रम; आता तर अभिनेत्याने मोडले सर्व रेकॉर्ड

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अजयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अजयच्या 'दृश्यम 2' ला चित्रपटला समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. खरंतर चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 2 दिवसांमध्येच चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 'दृश्यम 2' नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

 'दृश्यम 2' नं केली इतकी कमाई 

चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगमध्ये 'दृश्यम 2' ने शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 'दृश्यम 2' च्या कमाईत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे अजयच्या 'दृश्यम 2' नं बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 20-21 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

हेही वाचा : Drishyam 2 Leaked: प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' ला बसला फटका, चित्रपट लीक

'ब्रह्मास्त्र' चित्रपटानंतर 'दृश्यम 2' हा या वर्षातील दुसरा असा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्यानं प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठकनं 'दृश्यम 2' पहिल्या वीकेंडला 45 ते 50 कोटींचा गल्ला करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. (ajay devgn starrer drishyam 2 second day box office collection higher on day 2) 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या 'दृश्यम 2'ने शनिवारीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अशा परिस्थितीत 'दृश्यम 2' च्या दोन दिवसांच्या एकूण कमाईचा विचार केला तर आकडेवारी खूपच चांगली आहे. खरंतर, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दृश्यम 2' नं बॉक्स ऑफिसवर 15 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसरीकडे, अजयच्या या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जवळपास 20-21 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान,  आता 'दृश्यम 2' च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शननं 35-36 कोटींचा आकडा पार केला आहे.

Read More