Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ajay Devgan वर दुःखाचा डोंगर; गमावला कुटुंबातील खास सदस्य

कुटुंबातील खास सदस्याला गमावल्यामुळे अजय देवगन कोलमडला  

Ajay Devgan वर दुःखाचा डोंगर; गमावला कुटुंबातील खास सदस्य

मुंबई : अभिनेता अजय देवगन (Ajay Devgan) सध्या आगामी सिनेमा 'थँक गॉड'मुळे चर्चेत आहे. याच दरम्यान आलेल्या एका वाईट बातमीमुळे अभिनेता पूर्णपणे कोलमडला आहे. कुटुंबातील खास व्यक्तीच्या निधनामूळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दुःखद बातमी खुद्द अजयने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. अजयाचा पाळीव कुत्रा कोकोचं (pet dog coco) निधन झाल्यामुळे अभिनेत्यासह कुटुंब दुःखी आहे.

अजय ट्विट करत म्हणाला, 'मला खूप वाईट वाटतं की काल रात्री मी माझा लाडका कोको गमावला. कोकोचं जाणं माझ्यासाठी मोठं नुकसान आहे. कुटुंब आणि मला नेहमीच तुझी आठवण येईल....' सध्या अभिनेत्याची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.  (Ajay Devgan and family)

कोको अजयाच्या कुटुंबासाठी केवळ पाळीव प्राणी नव्हता तर, कुटुंबातील एक महत्त्वाचा सदस्य होता. अशा परिस्थितीत त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. (Kajal Devgan)

अजयचे आगामी सिनेमे  (Ajay Devgan film)
अजय देवगणच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच 'थँक गॉड' (Thank God) सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा 24 ऑक्टोबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Read More