Marathi News> मनोरंजन
Advertisement

लहान बाळालाही ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ, पहिल्या नजरेत पाहताच काय केलं पाहा?

ऐश्वर्या रायचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 लहान बाळालाही ऐश्वर्याच्या सौंदर्याची भुरळ, पहिल्या नजरेत पाहताच काय केलं पाहा?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने देशातच नाही तर परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिस वर्ल्ड झालेल्या ऐश्वर्याचे लाखो चाहते आहेत.

दरम्यान, मिस वर्ल्ड 1994 व्हिडिओ स्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायचा एक दुर्मिळ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये ती रडणाऱ्या मुलाला जवळ घेऊन शांत करताना दिसत आहे. हे बाळ ऐश्वर्य़ाकडे येताच शांत झाल्याचं बोललं जात आहे. ऐश्वर्याला ही लहान मुलांसोबत वेळ घालवायला फार आवडतो. स्वत:च्या मुलीची काळजी घेण्यासाठी जबाबदारी ही ती चोखपणे पार पाडत आहे. 

ऐश्वर्याचा हा जुना व्हिडिओ तिच्या एका फॅन क्लबने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ ऐश्वर्या मिस वर्ल्ड बनल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतानाचा आहे.

त्यांची एक सिंगल क्लिप बनवण्यात आली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तिची आई वृंदा राय छत्री धरून शेजारी उभी दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आणि रडणाऱ्या मुलाचे सांत्वन करताना दिसली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तसेच पुढच्या व्हिडिओमध्ये, ऐश्वर्याने लाल रंगाच्या साडीत केस बांधून इव्हेंटमध्ये फोटोसाठी पोज दिली. तिने हत्तीला सलाम केला, ज्याने तिच्यासाठी निरोपाचे फलक घातले होते. त्यानंतर ती हात जोडून तिथून निघून जाते.

Read More