Marathi News> मनोरंजन
Advertisement

Miss World जिंकल्यानंतर ऐश्वर्यानं दाखवला होता साधेपणा; 29 वर्षांनंतरही 'त्या' फोटोची आजही चर्चा

Aishwarya Rai Miss World Viral Photo: 1994 साली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं मिस इंडियाचा किताब जिंकला परंतु त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. आज 29 वर्षांनंतरही तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सध्या हा फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. 

Miss World जिंकल्यानंतर ऐश्वर्यानं दाखवला होता साधेपणा; 29 वर्षांनंतरही 'त्या' फोटोची आजही चर्चा

Aishwarya Rai Miss World Viral Photo : बच्चन कुटुंबिय हे अनेकदा चर्चेत असतात. त्यातून ऐश्वर्या आणि आराध्याचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. या वर्षी कान्स चित्रपट महोत्सव साजरा झाला त्याचसोबत मेट गालाही दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा झाला. या दोन्ही सोहळ्यांना गेल्या काही वर्षांपासून ऐश्वर्या ही लेकीसह हजेरी लावताना दिसते. त्यामुळे त्या दोघींची आणि त्यांच्या फॅशनची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी मेट गाला नाही तर ऐश्वर्यानं कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती परंतु यावेळी आपल्या फॅशनवरून ऐश्वर्या ही चांगलीच ट्रोल झाली. तिचा आऊटफिट हा सगळ्यांपेक्षा वेगळा होता. परंतु त्या ड्रेसवरून तिच्या अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. त्याआधी तिनं कान्स चित्रपट महोत्सवात जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावली होती. 

या लिपस्टिकमुळेही ती ट्रोल झाली होती. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे अनेकदा कौतुक होताना दिसते. त्यामुळे तिची चर्चा ही सोशल मीडियावर रंगतेच रंगते. आता 2023 हे वर्ष सुरू आहे परंतु आता आपण जाऊया 1994 मध्ये. ऐश्वर्या राय कोण? याची ओळख करून देणारा ते मिस वर्ल्डचा शो तिच्यासाठी नशीब पलटवणारा ठरला परंतु त्या शोमध्येही तिचा साधेपणा पाहून अनेकांनी तिचे कौतुकही केले होते. सोबतच तिच्या या साधेपणामुळे ती सर्वांच्याच जास्त लक्षात राहिली होती. आता हाच फोटो आपण जर का 2023 मध्ये पाहिलात तर तुम्हाला त्याची कल्पना येईलच. 

हेही वाचा - VIDEO: ''अपहरण करताना रावणानं सीतेला स्पर्श केला नाही, कारण...''; 'आदिपुरूष'च्या लेखकाचा खुलासा

इतका मोठा शो आणि तोही मिस वर्ल्डचा. तो डोक्यावरचा मुकूट आणि तो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या चक्क आपल्या आईसह खाली बसून जेवताना दिसली तेही त्याच मिस वर्ल्डच्या आवेशात. तिचा हा फोटो तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. खाली जमिनीवर बसून यावेळी तिनं आपल्या ताटात वाढलेल्या जेवणाचा आनंद घेतला होता. तिचा हा फोटो ट्विटरवर सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. त्यातून या फोटोवर नेटकरी नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अनेकांनी यावेळी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी ट्रोलही करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा फोटो पुन्हा एकदा सगळीकडे व्हायरल होतो आहे. 

सध्या हा फोटो काही युझर्सनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या वर्षी ऐश्वर्याचा PS2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

Read More