Marathi News> मनोरंजन
Advertisement

जगासाठी विश्वसुंदरी असणारी Aishwarya Rai भावाच्या मुलांसाठी मात्र .... मामी

Aishwarya Rai ला 'या' नावाने हाक मारतात तिच्या भावाची मुलं...   

जगासाठी विश्वसुंदरी असणारी Aishwarya Rai भावाच्या मुलांसाठी मात्र .... मामी

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने अनेक सिनेमांमध्ये अभिनय करून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ऐश्वर्या बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या चर्चा मात्र कायम रंगत असतात. पती अभिषेक बच्चन, सासू-सासरे महानायक जया बच्चन आणि अमिताभ बच्चन  यांच्यासोबत ऐश्वर्याला कायम स्पॉट केलं जातं. सासरच्या मंडळींसोबतचं ऐश्वर्या माहेरच्या मंडळींना देखील तितकचं महत्त्व देते. 

ऐश्वर्याच्या भावाची पत्नी श्रीमा देखील दिसायला ऐशपेक्षा कमी नाही. ऐश्वर्याची वहिनी श्रीमा अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. श्रीमा कायम स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. श्रीमाला दोन मुल आहेत.  

fallbacks

एकदा एका युजरने श्रीमाला विचारलं, 'तुझ्या मुलांना कसं सांगते की त्यांची मामी एवढी प्रसिद्ध आहे?' या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीमा म्हणाली, 'आमच्या घरात हा चर्चेचा विषय नाही. माझी मुल ऐशला गुलू मामी म्हणून हाक मारतात... '

एवढंच नाही तर ऐश्वर्या आणि श्रीमा यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, दोन्हींमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे. ते सण आणि सर्व उत्सवांमध्ये एकत्र दिसतात.

Read More