Marathi News> मनोरंजन
Advertisement

Airtel 5G : Nokia सह या स्मार्टफोनमध्ये कंपनी देणार 5G सेवा

Airtel ने अलीकडेच भारतात 5G सेवा लॉन्च करणार असल्याची घोषणा केलीये. पाहा कोणत्या स्मार्टफोन ब्रँड 5G सेवा ऑफर करणार आहेत.

Airtel 5G : Nokia सह या स्मार्टफोनमध्ये कंपनी देणार 5G सेवा

Airtel 5G service: भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. भारतातील सर्व दूरसंचार ऑपरेटर, Jio, Vodafone Idea, Airtel (Airtel) आणि गौतम अदानी यांची कंपनी, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावात भाग घेत आहेत. लिलावादरम्यानच खाजगी दूरसंचार कंपनी एअरटेलने जाहीर केले आहे की ते कोणत्या स्मार्टफोन कंपन्यांसाठी भारतात 5G सेवा देणार आहेत. 5G सेवांच्या बाबतीत एअरटेलचा प्लॅन काय आहे ते जाणून घेऊया.

अलीकडेच Airtel ने घोषणा केली आहे की त्यांनी अनेक आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांसोबत 5G नेटवर्कवर करार केला आहे. या कंपन्यांमध्ये नोकिया, सॅमसंग आणि एरिक्सनच्या नावांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या लिलावात सुनील मित्तल यांच्या एअरटेलने 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 3300 MHz आणि 26 GHz मध्ये 19,867.8 MHz स्पेक्ट्रम विकत घेतले आहे. भारती एअरटेलने नुकत्याच संपलेल्या लिलावात 43,084 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम विकत घेतले आहे आणि सध्या ते चांगल्या स्थितीत आहे.

Read More