Marathi News> मनोरंजन
Advertisement

कुटुंबात खरंच वाद! काहीही काय... बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्यानं आनंदानं साजरी केली होळी

Aishwarya Rai With Bachchan Family : ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबानं एकत्र साजरी केली होळी... फोटो व्हायरल

कुटुंबात खरंच वाद! काहीही काय... बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्यानं आनंदानं साजरी केली होळी

Aishwarya Rai With Bachchan Family : काल आणि आज सगळेच आपल्याला होळीच्या उत्साहात पाहायला मिळाले. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी मोठ्या आनंदानं काल होळी साजरी केली. यावेळी बच्चन कुटुंबाच्या होळीनं सगळ्यांचे लक्ष वेधले. संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन होळी साजरी केली. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्यात पाहायला मिळत आहे की बच्चन कुटुंबानं त्यांच्या घराच्या लॉनमध्ये होळी साजरी केली. नव्यानं शेअर केलेल्या या फोटोत ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन हे संपूर्ण कुटुंबासोबत होळी पेटवताना दिसत आहे. त्यानंतर त्यांनी धुळवड देखील खेळली आहे. नव्यानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुरुवातीला ती होळीसोबत पोज देताना दिसते. त्यासोबत तिचा मामा म्हणजेच अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्याशिवाय घरातील इतर सदस्य देखील गुलाल घेऊन धुळवड खेळताना दिसत आहेत. त्यांच्याशिवाय जया बच्चन आणि अमिताभ बच्चनही यावेळी दिसले. नव्यानं हे फोटो शेअर करत होलिका दहन असं कॅप्शन दिलं आहे. त्याशिवाय अभिषेकनं देखील काही फोटो शेअर केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ बच्चन दरवर्षी त्यांच्या घरी होळी पेटवतात. त्याशिवाय होळीचे किंवा धुळवडीचे एकना एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. या होळीच्या आधी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घराच्या बाहेर जमा झालेल्या त्यांच्या चाहत्यांची भेट घेतली. सगळे चाहते हे अमिताभ यांच्यासोबत 'बच्चन वाली होली' पोहोचले होते. त्यावेळी अमिताभ यांनी सगळ्यांची भेट घेतली आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, अमिताभ यांनी एकदा सांगितलं होतं की त्यांची लक्षात राहिलेली होळी कोणती असेल तर ती इलाहाबाद म्हणजेच आताच प्रयागराजची आहे. अमिताभ यांनी 2016 च्या त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की बाबा, तेव्हा इलाहाबाद (प्रयागराज) युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजी डिपार्टमेंटमध्ये शिकवायचे. होळीला सगळे विद्यार्थी घरी यायचे आणि मस्ती म्हणजेच गाणी लावून नाचायचे. 

हेही वाचा : ऑनस्क्रीन 'राम' निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या तिकीटावर 'या' मतदार संघातून उमेदवारी

दरम्यान, घटस्फोटाच्या आणि बच्चन कुटुंबासोबत पटत नसल्याच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबासोबत होळी आणि धुळवड खेळताना दिसली. ऐश्वर्यानं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून तिच्या कपाळावर टिळा दिसत आहे. सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाचे हे फोटो फार व्हायरल होत आहेत.

Read More