Marathi News> मनोरंजन
Advertisement

आसावरी- अभिजीतच्या विवाहसोहळ्यात काय असेल शुभ्राची भूमिका?

काय आहे ही भूमिका ते एकदा पाहाच.... 

आसावरी- अभिजीतच्या विवाहसोहळ्यात काय असेल शुभ्राची भूमिका?

मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा आला आहे. हा टप्पा म्हणजे आसावरी आणि अभिजीत यांच्या लग्नसोहळ्याचा. आजोबांच्या विरोधाचं आव्हान पार करत अखेर त्यांच्या सहमतीने 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील मुख्य पात्र, आसावरी आणि अभिजीत हे लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. 

सध्या या मालिकेच्या कथानकाची गरज पाहता सेटवर सुरु असणारी लगीनघाई येत्या काही दिवसांतील मालिकेच्या भागांमध्येही पाहायला मिळणार आहे. आता लग्न म्हटलं की विधी आणि तितक्याच रुढी- परंपरांचं पालन करणं आलंच. इथेही तसंच काहीसं चित्र दिसत आहे. 

'झी मराठी'च्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. आसावरीच्या जीवनात आलेल्या या सर्व आनंदाचं श्रेय कोणाला द्यायचं झाल्याच घराघरातून एकच नाव पुढे केलं जाईल. ते नाव म्हणजे शुभ्राचं, आसावरीच्या सुनेचं. आता हीच सुन आपल्या सासूच्या लग्नामध्ये तिची करवली म्हणूनही दिसणार आहे. 

वाचा : सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा

लग्नाच्या तयारीमघ्ये रमलेल्या शुभ्राने साऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने आपल्या खांद्यावर घेतल्या. त्यातच आता खुद्द आसावरी तिला एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी देत आहे. ही जबाबदारी म्हणजे लग्नात करवली होण्याची. आता लाडक्या सासूचा हा आग्रह पाहता शुभ्रा कसा बरं नकार देईल? तेव्हा आता आसावरीची ही करवली आणि तिचा लग्नातील थाट नेमका कसा असणार हे पाहण्यासाठीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. 

 

Read More