Marathi News> मनोरंजन
Advertisement

Shah Rukh Khan पाठोपाठ 'ही' अभिनेत्री पोहचली उमराहला, अभिनेत्रीचे Photo Viral

shah rukh khan नंतर आता 21 वर्षीय Jannat Zubair ने केला उमराह, भावासोबत अभिनेत्रीचे Photo viral  

Shah Rukh Khan पाठोपाठ 'ही' अभिनेत्री पोहचली उमराहला, अभिनेत्रीचे Photo Viral

Jannat Zubair Umrah : टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन जन्नत जुबैर रहमानी (Jannat Zubair) हिला सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही, तिनं लहान वयातच स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. ती नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते. ती आणि तिचा भाऊ अयान जुबेर दोघंही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. हल्लीच या दोघा भावडांनी आपले उमराचे फोटो शेअर करुन त्यांच्यासाठी गोड बातमी दिली. जन्नत जुबैर रहमानीने तिचा पहिला उमराह पूर्ण केला आहे. भाऊ अयान जुबेरही तिच्यासोबत उमराह करण्यासाठी मक्का पोहोचला. जन्नतने उमराहमधील फोटो शेअर करुन सगळ्यांना अचंबित केले. त्या फोटोत दोघांच्या चेहऱ्यावर शांतता आणि आंनद पाहायला मिळाला.


शाहरुख खानही मक्केत

मुस्लिम धर्मात उमराहला (Umrah) विशेष मानले जाते. दरवर्षी लाखो भक्त मक्केला उमराह करण्यासाठी जातात. यापूर्वी बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खाननेही मक्केत उमराह करण्यासाठी पोहचला होता. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. शाहरुख खाननंतर आता टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेरनेही उमराह केला आहे. तिने तिचा भाऊ अयान जुबेरसोबत उमराह केला आहे.

fallbacks


 

जन्नत जुबेर उमराहच्या कपड्यांमध्ये...

जन्नत जुबेर ही नेहमीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टींचा खुलासा करत असते. तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भाऊ अयानसोबत मक्केला उमराह करण्यासाठी गेलेल्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जन्नत जुबेर आणि तिचा भाऊ उमराहच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. हे फोटो शेअर करत तिने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

fallbacks


'जुम्मा मुबारक...

जन्नत जुबेरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जुम्मा मुबारक, आमचा पहिला उमराह अलहमदुलिल्लाह पूर्ण झाला.' जन्नत जुबेर आणि तिच्या भावाचे उमराहचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे चाहते या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री जन्नत जुबैर कमी वेळातच आणि लहान वयात तिनं स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिनं तिच्या करिअरला टीव्ही मालिकांमधून सुरुवात केली आणि तिनं तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. 

Read More