Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटानंतर समंथा या व्यक्तीच्या प्रेमात, ख्रिसमसच्या मुहूर्तावर फोटो शेअर

या फोटोला चाहतेही भरभरून प्रेम देत आहेत

 घटस्फोटानंतर समंथा या व्यक्तीच्या प्रेमात, ख्रिसमसच्या मुहूर्तावर फोटो शेअर

मुंबई : ख्रिसमसला लवकरच सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकार ख्रिसमसच्या तयारीत गुंतले आहेत. दरम्यान, साऊथ स्टार समंथा प्रभू देखील ख्रिसमसचा आनंद लुटताना दिसत आहे.

तिने तिच्या सोशल मीडिया हँडल इन्स्टाग्रामवर आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून असे दिसते की समंथा वीकेंड खूप एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे.

यावेळी समंथा तिच्या डॉगसोबत ख्रिसमस साजरा करत आहे, फोटो शेअर करताना समंथाने कॅप्शनमध्ये ख्रिसमस ट्री इमोजी देखील टाकला आहे. अनेक फोटोंमध्ये, समंथा बेडवर आराम करताना दिसत आहे, ज्यामध्ये तिचा पेट डॉग देखील तिच्या दिसत आहे. तसे, समांथाच्या प्रत्येक फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोला चाहतेही भरभरून प्रेम देत आहेत. फोटोसोबत, समांथाने एक क्यूट व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या कुत्र्यासोबत ख्रिसमस गाणे ऐकत आहे. यावेळचे खास क्षण तिने शेअर केले आहेत.  

Read More