Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बिग बॉस 17' नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज

बिग बॉस १७ गाजवल्यानतंररही अंकिता लोखंडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मात्र यावेळी अंकिताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे.

'बिग बॉस 17' नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज

मुंबई : बिग बॉस १७ चा फिनाले नुकताच पार पडला आहे. ज्यामुळे विनरची ट्रॉफी मुनव्वर फारुकीच्या नावे कोरली गेली तर सेकंड रनरअप अभिषेक कुमार आणि मन्नारा चोपडा राहीले.  तर अंकिता लोखंडे आणि अरुण महाशेट्टी हो दोघं चौथ्या पाचव्या नंबरवर होते. तर दुसरीकडे हा शो संपला आहे तर प्रत्यकेजण आप आपल्या कामावर परतले आहेत. या सगळ्यानंतर अंकिताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. नुकताच शो संपल्यावर अंकिताने तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. जे पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

अंकिताने लोखंडेने इन्स्टाग्रामवर  पहिली झलक शेअर करत म्हटलंय की,  ''इतिहासाच्या अध्यायांतून हरवलेल्या नेत्याला प्रकाशात आणत आहे! BB17 नंतर इतक्या लवकर एक नवीन काम सुरू करणं खूप खास आहे. झी स्टुडिओज निर्मित आनंद पंडित आणि रणदीप हुडा याच्यासोबत या प्रोजेक्टचा भाग झाल्याबद्दल मी आभारी आहे. हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पाहायला विसरू नका.''  अंकिताने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
 
आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिनेमामध्ये स्वतंत्र वीर सावरकर  यांनी केलेल्या बलिदानाची अमर गाथा दाखवण्यात येणार आहे. रणदिप हुड्डा दिग्दर्शित हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. येत्या २२ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एखाद्या ज्वालेप्रमाणे धगधगत असलेल्या आणि रगा-रगात देशभक्तीचा भाव असलेला  स्वातंत्र्यसेनानी श्री वीर सावरकर उपेक्षित कथा या चित्रपटातून अतिशय सुंदरपणे चित्रित करण्यात आली आहे. तर अंकिता लोखंडेला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बिग बॉस 17 च्या चकाचक दुनियेत अंकिता लोखंडे तिच्या अनोख्या कामाने प्रेक्षकांना मोहित करत होती. ती या घरातील चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या अतुलनीय कामगिरीसाठी अंकिता या घरात कायम चर्चेत असायची आणि अश्यातच ती प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर च्या बिलबोर्डवरही झळकली होती. सगळ्यात जास्त कोणाची चर्चा होत असलेली अंकिता होती.

Read More