Marathi News> मनोरंजन
Advertisement

'प्लीज मला सोडू नको' राज कुंद्राच्या पोस्टने एकच खळबळ

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. 

'प्लीज मला सोडू नको' राज कुंद्राच्या पोस्टने एकच खळबळ

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच चर्चेत असते. मात्र तिचा पती राज कुंद्राही या बाबतीत कमी नाही. पोर्नोग्राफी प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर जुलै 2021 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उद्योगपती राज कुंद्रा दररोज प्रसिद्धीच्या झोतात असतो. तो अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत राहतात. सोबतच तो कधी मास्क घालून चेहरा कव्हर करताना दिसतो तर कधी हुडी घालून चेहरा लपवताना दिसतो.

सोशल मीडियावर ट्रोल होत असलेल्या राजला लोकं सांगतात की, चेहरा लपवावा लागतोअसं का वागता? मात्र, आता राज कुंद्राने ट्रोल करणाऱ्यांच्या नावाने एक पोस्ट शेअर केली आहे.

पोस्टमध्ये राज कुंद्राने या गोष्टी लिहिल्या आहेत
सोमवारी संध्याकाळी राज कुंद्राने ट्विटरवर ट्रोल करणाऱ्यांच्या नावाने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहिलं आहे की, "ट्रोलर्स तुम्ही हळूहळू कुठे गायब होत आहात, कृपया मला सोडून जाऊ नका."

मात्र, राज अनेकदा सोशल मीडियावर अशा पोस्ट ट्रोल करणाऱ्यांसाठी शेअर करत असतो. 9 सप्टेंबर रोजी त्याच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त त्याने अशीच पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिलं होतं की, "मला नवीन द्वेष करणाऱ्यांची गरज आहे, कारण जुने मला आवडू लागले आहेत.''

Read More