Marathi News> मनोरंजन
Advertisement

Urmila Matondkar : उर्मिलाच्या नवऱ्याने फोटो पोस्ट केला आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला... त्यानंतर

Urmila Matondakr wishes :अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondakr) आणि तिचा नवरा मोहसिन अख्तर (Mohsin Akhtar) हे जोडपे अचानक सोशल मीडियावर चर्चेत आले आहे एका फोटोमुळे.  

Urmila Matondkar : उर्मिलाच्या नवऱ्याने फोटो पोस्ट केला आणि  शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला... त्यानंतर

Urmila Matondakr wishes :अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondakr) आणि तिचा नवरा मोहसिन अख्तर (Mohsin Akhtar) हे जोडपे अचानक सोशल मीडियावर चर्चेत आले. 13 सप्टेंबर 200 रोजी सकाळी, सकाळी उर्मिलाच्या नवऱ्याने एका लहान क्यूट बेबी गर्लसोबत आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि एकच चर्चा सुरु झाली. उर्मिला आणि मोहसिन आई-बाबा झाल्याची. चाहत्यांना वाटलं या कपलनं मुलगी दत्तक घेतली होती आणि ही गोष्ट सीक्रेट ठेवली होती.  

उर्मिला मातोंडकरचा नवरा मोहसिननं आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं होतं की, 'वॉव, लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्याने आमचं आयुष्य उजळून निघाले आहे. आज तुझा पहिला वाढदिवस साजरा करताना आनंद होतोय आणि सांगावसं वाटतंय तू हे एक वर्ष फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यात आनंद भरलायस, हॅप्पी बर्थडे प्रिय आयरा'.

यानंतर चाहत्यांनी थेट दोघांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. हा  फोटो अधिक व्हायरल होत गेला. त्यानंतर आपली झालेली चूक लक्षात येतात मोहसिन अख्तर यांनी ही पोस्ट एडिट केली आणि खरं काय ते समोर आलं. त्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohsin Akhtar (@mohsinakh)

उर्मिला आणि मोहसिन या दोघांनी स्पष्ट केलं की,आयरा ही आमची पुतणी आहे. मोहसिनच्या मोठ्या भावाची मुलगी, असे उर्मिलाने स्पष्ट केले. त्यानंतर मोहसिनने आपली पोस्ट एडिट करत त्यात आयरा ही आपली पुतणी आहे, असा स्प्षट उल्लेख केला.

दरम्यान, चाहत्यांना वाटलं होतं की, उर्मिलानं मुलगी दत्तक घेतली आहे आणि ती आई बनली आहे. मात्र, खरी माहिती समोर आल्यानंतर आता नेटकरी आयरा हिच्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Read More