Marathi News> मनोरंजन
Advertisement

वयाच्या ४८ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली अभिनेत्री सुष्मिता सेन? फोटो आला समोर

अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकताच तिचा ४८वा वाढदिवस साजरा केला आहे. नेहमीच सुष्मिता तिच्या प्रोफेशन आयुष्यापेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. 

वयाच्या ४८ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली अभिनेत्री सुष्मिता सेन? फोटो आला समोर

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकताच तिचा ४८वा वाढदिवस साजरा केला आहे. नेहमीच सुष्मिता तिच्या प्रोफेशन आयुष्यापेक्षा पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सुष्मिताचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सुष्मिता नेहमीच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्यापेक्षा वयाने लहान बॉयफ्रेंडला डेटिंगमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या पेक्षा वयाने मोठ्या ललित मोदी यांच्यासोबत तिच्या रिलेशनशिपची चर्चा होती. यानंतर तिला गोल्ड डिगरदेखील म्हणून ट्रोल करण्यात आलं. मात्र या सगळ्याकडे सुष्मिताने दुर्लक्ष केला होता. ललित मोदी यांनी स्वत: त्यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं होतं. 

या सगळ्यानंतर सुष्मिता काही दिवसांपुर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत स्पॉट झाली होती एवढंच नव्हेतर या दोघांनी पापाराझींसमोर पोजही दिल्या होत्या. यानंतर या दोघांच्या पॅचअपच्या बातम्यानी जोर धरला. नुकताच सुष्मिताचा वाढदिवस पार पडला आणि या निमित्ताने रोहमनने तिच्या वाढदिवसानिमीत्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये ती नववधूच्या वेशात दिसत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यानंतर युजर्सचं असं म्हणणं आहे की, तिने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. अनेकांना तिचा हा अंदाज आवडला आहे तर अनेकांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.

या फोटोवर कमेंट करत एकाने लिहीलंय की, मला वाटतं की, सुष्मिताने लग्न केलं आहे. ओह...' तर अजून एकाने म्हटलंय, तुला आणि रोहमनला एकत्र पाहून खूप छान वाटतं.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  तर अजून एकाने लिहीलंय, अल्लाह तु या दोघांच्या जोडीला नेमहीच सुखरुप ठेव. तर अजून एकाने लिहीलंय, दोघांनी गुपचूप लग्न केलं आहे का? तर अजून एकाने म्हटलंय दे दोघं एकत्र खूप सुंदर दिसतात. तर अजून एकाने म्हटलंय, दे दोघं कधी लग्न करणार? तर अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करत रोहमनने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'Happy birthday wonder women'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतीच सुष्मिता सेनने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी अभिनेत्रा 48 वर्षांची झाली. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'आर्य 3'च्या प्रमोशननंतर सुष्मिता सेनही तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिवाळी पार्टीत दिसली होती. आता रोहमन शॉलने सुष्मिता सेनचा एक सुंदर फोटो शेअर करून लोकांना धक्का दिला आहे. डेमोल शाइन इंडिया द्वारे सह-निर्मित, 'आर्या 3' 3 नोव्हेंबरपासून सुष्मिता सेनची OTT प्रदर्शित झाली आहे.   डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सिरीज तुम्हाला पाहता येईल. याआधी ही अभिनेत्री 'ताली' या वेबसिरीजमध्येही दिसली होती.

Read More