Marathi News> मनोरंजन
Advertisement

प्रियांका चोप्राच्या दीराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सोफी टर्नरने केला साखरपुडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी सोफी ही पेरेग्रीन पियर्सन सोबत फिरताना दिसली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकजण त्यांनी साखरपुडा केल्याचा अंदाज लावत आहेत. 

प्रियांका चोप्राच्या दीराबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर सोफी टर्नरने केला साखरपुडा? फोटोंमुळे चर्चांना उधाण

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनसने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली. लग्नानंतर चार वर्षांनी जो जोनस आणि त्याची पत्नी सोफी टर्नर हे वेगळे झाले. त्या दोघांनी सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत याबद्दलची सांगितले होते. त्यानंतर आता अवघ्या तीन महिन्यातच सोफी टर्नरने साखरपुडा केल्याची चर्चा रंगली आहे. तिचा एक फोटो सोसल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून सोफी टर्नर ही पेरेग्रीन पियर्सनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता सोफी टर्नरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती हातात मोठी बॅग घेऊन कुठे तरी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो हिथ्रो विमानतळावरील असून ती फारच आनंदात असल्याचे दिसत आहे. 

यावेळी सोफीच्या हातातील अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिने सोनेरी रंगाचे बँड परिधान केले होते. तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकजण तिने साखरपुडा केल्याचा अंदाज वर्तवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सोफी ही पेरेग्रीन पियर्सन सोबत फिरताना दिसली होती. त्यानंतर ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकजण त्यांनी साखरपुडा केल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र अद्याप तिने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

fallbacks

तर दुसरीकडे जो जोनस हा त्याची गर्लफ्रेंड स्टॉर्मीसोबत फिरताना दिसला होता. जो जोनस हा मिस टीन युएसए (Miss Teen USA) असलेल्या स्टॉर्मीसोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. ते दोघेही रोमँटिक ट्रिपवरही गेले होते. यानंतरच सोफी आणि जो जोनस यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. 

चार वर्षांनतर घेतला घटस्फोट

दरम्यान जो जोनस आणि सोफी टर्नर एकमेकांना २०१६ मध्ये भेटले होते. त्यांनी २०१७ मध्ये एंगेजमेंट केली व २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुली आहेत. २०२० मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली आणि २०२२ मध्ये दुसरी मुलगी झाली. लग्नानंतर चार वर्षांनी ते दोघेही वेगळे झाले. त्या दोघांनी एक अधिकृत निवेदन जारी केले होते. 

“आम्हा दोघांकडून हे अधिकृत निवेदन. लग्नाच्या चार वर्षानंतर आम्ही दोघांनी परस्पर संमतीने आमचा विवाह संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे का करत आहोत, याबद्दल सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. पण आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की प्रत्येकजण आमच्या इच्छेचा आणि आमच्या मुलांच्या गोपनीयतेच्या आदर करेल”, असे त्या दोघांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते. 

Read More