Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्री श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ

 आता अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) या दोघींच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty) या दोघींच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. 

आपण जेलमध्ये असताना श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीनं आपली भेट घेतल्याची माहिती सुकेश चंद्रशेखरनं ईडीला दिलीय. त्यामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी या दोघींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

सुकेश चंद्रशेखर याने ईडीला दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा आणि शिल्पा यांच्यासोबत सुकेशचं 2015 पासूनच कनेक्शन होतं. NCBच्या केसमध्ये सुकेशने श्रद्धाला मदत केली होती. तर राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला असताना सुकेश याने शिल्पालाही मदत केली होती. ईडीने मात्र सुकेश चंद्रशेखर बनाव करत असल्याचे म्हटले आहे.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याची सध्या ईडी चौकशी करत आहे. त्याचे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टीसह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींशी संबंध आहेत, असे बोलले जात आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या वक्तव्यानुसार, ईडीने खुलासा केला आहे की सुकेश 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखत होता आणि तिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) प्रकरणात मदत केली होती.

Read More