Marathi News> मनोरंजन
Advertisement

८५व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पुष्पा जोशी यांचं निधन

वयाच्या या टप्प्यावरही.... 

८५व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पुष्पा जोशी यांचं निधन


मुंबई : हिंदी कलाविश्वात वयाच्या ८५व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या म्हणजेच सर्वात वयोवृद्ध नवोदित कलाकार म्हणून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री पुष्पा जोशी यांचं मंगळवारी म्हणजेच २६ नोव्हेंबरला निधन झालं. अजय देवगणसोबतच्या 'रेड' या चित्रपटात त्या झळकल्या होत्या. दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी ट्विट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

''पुष्पा जोशी यांच्या निधनाचं वृत्त कळताच मला फार दु:ख झालं. दिग्दर्शक म्हणून माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय अनुभव विचाराल तर, तो म्हणजे 'रेड'मध्ये त्यांना काम करताना पाहणं'', असं ट्विटमध्ये लिहित तुम्ही जिथे कुठे असाल तिथे कायम आनंदात राहा आणि हा आनंद पसरवत राहा या शब्दांत त्यांनी पुष्पा जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. 

कास्टिंग डिरेक्टर शिखा प्रदीप यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुष्पा जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. काही दिवसांपूर्वीच फेव्हिक्वीकच्या जाहिरातीतूनही त्या झळकल्या होत्या. Oh Yessss! असं म्हणण्याचा त्यांचा अंदाज अनेकांची मनं जिंकून गेला होता. मुख्य म्हणजे ही जाहिरात इतकी व्हायरल झाली होती, की नेटकऱ्यांनी आजी हवी तर, अशी.... असं म्हणत त्यांचं कौतुक केलं होतं. 

वयाच्या या टप्प्यावरही पुष्पा यांचा उत्साह आणि जाहिरातीत अवघ्या काही मिनिटांसाठीसुद्धा दिसणारं त्यांचं रुप या जाहिरातीच्या जमेच्या बाजू ठरल्या. चेहऱ्यावरील स्मितहास्य, अनोखा अंदाज हा पुष्पा जोशी यांना अवघ्या काही काळातच लोकप्रिय करुन गेला होता. 

Read More