Marathi News> मनोरंजन
Advertisement

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: पोहे खाण्याचा मोह आपल्याला काही केल्या जात नाही. त्यातून ते पोहे गरमागरमच असेल पाहिजेत. परंतु सध्या अभिनेत्री मुक्ता बर्वेला पोहे खाण्याचा मात्र फारच वाईट अनुभव आला आहे. यावेळी याबाबत तिनं नाराजीची पोस्ट शेअर केली आहे. 

पोहे खाण्याचा वाईट अनुभव; नेटकऱ्यांमध्येही चीड, मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

Mukta Barve Nashik Pohe Post: गरमागरम पोहे खायला मिळाले की आपला दिवस सत्कारणी लागतो असं आपल्याला वाटतं. सिझन कुठलाही असो आपल्याला गरमागरम पोहे खायला मिळाले की मनं तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. परंतु सध्या व्हायरल झालेल्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा आहे. ही पोस्ट लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं शेअर केली आहे. यावेळी ती आपल्या पोस्टमध्ये जे लिहिलंय ते वाचून कदाचित तुम्हालाही यापुढे पोहे खावेत की नाही असा प्रश्न पडेल.

तिनं या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''माझा विश्वासच बसेना! खरं तर मी ‘श्री दत्त स्नॅक्स’ ची फॅन आहे. मुंबई-पुणे करताना अनेकदा तिथे आवर्जून खाण्याचा ब्रेक घेते मी. आज नाशिकला जाताना पडघा टोल नंतर खूप कौतुकानी थांबले आणि पोहे मागवले. अत्यंत अनास्थेनी, गरम असल्याचा भास होईल एवढेच जेमतेम गरम पोहे त्यांनी दिले आणि कमिटमेंट एवढी की पोहे म्हणजे फक्त पोहे. कांदा-मीठ आणि साखर बास!

जरा चव यावी म्हणुन कदाचित शेंगदाणे, शेव, कोथिंबीर, गेला बाजार लिंबू .. यातलं काहीच नाही. पैसे वाया गेल्याच्या दुःखापेक्षा भूक लागलेली असताना समोरच्या डीशमधे कोणीतरी एवढी अनास्था वाढून दिली याचं वाईट वाटलं.'' तिच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''मग घरून कांदा, पोहे घेऊन जायचे.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''पोह्यांना कावीळ झाली वाट्टं.'' तर अनेकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच काहींना यावर तिला विविध हॉटेल्सची यादी सुचवली आहे. तर अशाच एका युझरनं लिहिलंय की, ''यापेक्षा तर्री बरी.''. सध्या यावर बऱ्याच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी या पोस्टची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

हेही वाचा : 'गर्दीचा फायदा घेत त्यांनी...'; भर रस्त्यातील 'त्या' प्रसंगाबाबत बोलताना अभिनेत्रीच्या अंगावर काटा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या मुक्ता बर्वे आपल्या 'चारचौघी' हे नाटकं रंगभूमीवर प्रचंड गाजतं आहे. या नाटकाच्या निमित्तानं मुक्ता बर्वे अनेकदा दौऱ्यावर असते. आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही ते ती शेअर करताना दिसते. या नाटकातून मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी यांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत. बाहेरच्या हॉटेलमध्ये खायला आपल्याला अनेकदा वाईट अनुभव हा येताना दिसतो. त्यातून अशावेळी आपल्याला योग्य ती काळजीही घ्यावी लागते. 

Read More