Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा

Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कोणती नाती कशी निघतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा सध्या चर्चा आहे ती म्हणजे कियारा अडवाणी आणि सलमान खान यांच्या नात्याची. तुम्हाला माहितीये का की कियारा अडवाणी आणि सलमान खानच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे एकमेकांशी जवळचे संबंध आहेत. 

सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड आहे कियारा अडवाणीची मावशी, अभिनेत्रीनंच केला खुलासा

Kiara Advani and Salman Khan Relationship: बॉलिवूडमध्ये कधी कोण कोणाचं नातेवाईक असेल किंवा कोणाचं नातं हे कोणासोबत असेल याचा काही नेम नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्याच चर्चा रंगताना दिसतात. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगतात त्या म्हणजे बॉलिवूडच्या रिलेशनशिप्सच्या. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड संगीता बिजलानी यांच्या रिलेशनशिप्सची. त्यांच्या या रिलेशनशिपबद्दल अख्ख्या बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली होती परंतु त्यांचे नाते काही पुढे गेले नाही आणि त्यांचे ठरलेले लग्नही मोडले. सलमान खान आणि संगीताच्या लग्नाचे कार्ड्सही प्रिंट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती आजही त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. 

परंतु तुम्हाला माहितीये का की सलमान खानची अजून एक गर्लफ्रेंड होती आणि तिचे थेट रिलेशन हे अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याशी आहे. तुम्हाला जाणून घेऊन कदाचित आश्चर्य वाटेल रंतु हे खरं आहे. त्यांच्या रिलेशनशिप्सच्याही अनेकदा चर्चा रंगल्या होत्या. सलमान खानची ही एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री कियारा अडवाणीच्या संबंधातली आहे. कियारा अडवाणी ही तिची भाची आहे. या एक्स गर्लफ्रेंडचे नावं आहे शाहिन अग्रवाल. शाहिन ही कियारा अडवाणीच्या आईची बहीण आहे, अनेकांना कदाचित या रिलेशनशिपबद्दल माहितीही नसेल. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या अनेक अफेअर्सबद्दल बोललं आणि लिहिले जाते. त्यामुळे त्यांची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता सलमान खान हा बी-टाऊनचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. आपल्या हॅण्डसम लुकनं तो आपल्या चाहत्यांना घायाळ करताना दिसतो त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सलमान खान कायमच इतरांना मदत करण्यासाठी तत्पर अशतो. त्यातून त्याच्या अभिनयाची आणि डान्सची जेवढी चर्चा होते तेवढीच त्याच्या लव्ह अफेअर्सहीची होते. 'वूट' च्या 'फीट अप विद द स्टार्स' या शोमध्ये कियारानं याविषयीचा खुलासा केला होता. 

कियाराची आई जेनेवीव अडवाणी आणि सलमान खान हे लहानपणापासूनचे मित्र होते. यावर कियारा म्हणाली होती की, माझी आई सलमान खान यांना ओळखत होती. ते दोघं बांद्रामध्ये लहानाचे मोठे झाले आहेत. सलमान खान नेहमी माझ्या आईला सांगायचे की ते एक ना एक दिवस स्टार होतील. ते एकत्र पुष्कळ दिवस मित्र होते आणि ते एकत्र सायकलिंगही करायचे. 

हेही वाचा - अपयशाची भीती वाटते? मराठमोळ्या अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

यावेळी तिनं आपल्या मावशीबद्दलही खुलासा केला. ती म्हणाली की तिची मावशी शाहिन आणि सलमान खान यांचे प्रेम होते हे त्यांचे पहिले प्रेम होते. तिनं सांगितले की तिच्या आईनंच त्या दोघांची भेट घडवून आणली होती. त्या दोघांनी एकमेकींना डेट केले होते असं ती म्हणाली. 

शाहिन आणि सलमान खान यांचे लग्नही ठरले होते असेही काही मीडिया रिपोट्समधून कळते. यावेळी संगीता बिजलानी हिच्यासोबत सलमानची जवळीक वाढू लागली आणि म्हणून शाहिन आणि सलमानच्या नात्यात दुरावा आला होता. शाहिन यांनी 1994 साली बिझनेसमन विक्रम अग्रवाल यांच्याशी लग्न केले. आता त्यांचा संसारही सुरळीत सुरू आहे. 

Read More