Marathi News> मनोरंजन
Advertisement

janhvi च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ म्हणाली, Kareena Kapoor इतक्या कॉन्फिडन्समध्ये की....'

पण जान्हवी पुढे जे नावं घेतले त्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. 

janhvi च्या वक्तव्यानंतर एकच खळबळ म्हणाली, Kareena Kapoor इतक्या कॉन्फिडन्समध्ये की....'

Janhavi Kapoor on Kareena Kapoor: जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेण्ड होते आहे. तिच्या फॅशन आऊटफिट्समुळे ती चांगलीच चर्चेत असते. नुकतीच ती एका कार्यक्रमादरम्यान टेंगेरिन बॉडीकॉन स्टाईलचा ड्रेस घालताना दिसली. तिच्या या ग्लॅमरस लुकमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. नुकत्याच सहभागी झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये तिनं करीना कपूरविषयी केलेलं विधान सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. (actress janhavi kapoor says she admire kareena kapoors fashion and style)

या कार्यक्रमादरम्यान तिला विचारण्यात आलं की बॉलीवूडमधील तुझे आवडते सर्वात स्टायलिश स्टार्स कोण आहेत, तर यावेळी तिनं अहान शेट्टी (Aahan Shetty) आणि रणवीर सिंगचं (Ranveer Singh) नाव घेतलं. रणवीरबद्दल बोलताना ती म्हणाली की आज रणवीर कपूरची फॅशन सगळ्यांना आवडते पण काहींना नाही आवडत म्हणून तो निराश होत नाही तर त्याच आत्मविश्वासानं तो फॅशन कॅरी करतो. 

पण जान्हवी पुढे जे नावं घेतले त्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. जान्हवीनं सांगितलं की तिला करीना कपूरची फॅशन (Kareena Kapoor Fashion) जास्त आवडते, 'करीना मॅम जे काही परिधान करतात, मग ते रेड कार्पेटसाठी असो वा अगदी जिम लुक, करीना कपूर इतक्या कॉन्फिडन्समध्ये कपडे घालतात की मी तर त्यांना पाहतच राहते.' अशी माहिती तिनं यावेळी तिनं दिली. 

जान्हवी कपूर 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mister and Misses Mahi) या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. याशिवाय वरुण धवनसोबत नितेश तिवारीचा 'बावल' (Bawal) हा चित्रपट ती करते आहे. जान्हवीने तिचे वडील बोनी कपूर (Janhavi Kapoor Father Bonney Kapoor) यांची निर्मिती असलेला 'मिली' हा सिनेमाही ती करते आहे. 

Read More