Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल

ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

अभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल

Mumbai: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही जरी चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी अनेक वादांवर चांगलीच सक्रिय असते. उर्वशी आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रिशब पंत (Ex boyfriend Rishabh Pant) या दोघांचे नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) खटके उडत असतात. अनेकदा तुमचे वाद कोणासोबत आहेत याचा विचार फारसा केला जात नाही पण तुमचा ग्लोबल (Global) वावर कसा आहे हे लक्षात घेतलं जातं. पण तुम्हाला माहितेय का उर्वशी रौतेलाने स्वत:ची चांगलीच इमेज जागतिक स्तरावर केली आहे. ती अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडमधून दिसत असते.  इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 60 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (actress Instagram takes so many crores for one post nz)

fallbacks

 

आणखी वाचा - उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

 

फार कमी लोकांना माहित असेल की अभिनेत्री या इंस्टाग्रामवर पोस्ट (Post) करण्यासाठी कोटी रुपये घेत असतात. ती एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 3.5 कोटी रुपये घेते. या बाबतीत उर्वशीने चक्क सलमान खान (Salman khan), हृतिक रोशन (Hrithik Roshan), रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि एम.एस. धोनी (M.S. Dhoni) सारख्या मोठ्या कलाकारांना मागे टाकलं आहे. हल्ली सोशल मीडियाच्या जगात अनेक सेलिब्रिटी (celebrity) ऑनलाइन प्रोडक्ट्सची जाहिरात करून पैसे कमवत आहेत. 

fallbacks

उर्वशी रौतेलाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. टॉप सोशल रिच लिस्टमध्ये तिचे नाव विराट कोहलीनंतर येते. उर्वशीने मनोरंजन क्षेत्रात आतापर्यंत चांगलेच योगदान दिले आहे. म्हणूनच उर्वशी रौतेलाचे नाव 2022 मधील टॉप 5 जागतिक कलाकारांच्या यादीत ही आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींपैकी उर्वशी रौतेला एक आहे. 

आणखी वाचा - 19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो

 

उर्वशी लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे, ज्याची निर्मिती नेटफ्लिक्स, टॉमस मेंडेस करणार आहे. याचे दिग्दर्शन 365 डेजच्या दिग्दर्शिका बार्बरा बायलोव्हास करणार आहेत. मर्चंट ऑफ व्हेनिसवर आधारित विल्यम शेक्सपियरच्या द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोझ’मध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे. सुपरहिट 'थिरुट्टू पायले 2' च्या हिंदी रिमेकसोबतच तिने जिओसोबत तीन चित्रपटांचा करारही केला आहे. उर्वशी तिच्या पुढील हॉलिवूड गाण्याच्या सिंगलमध्ये आंतरराष्ट्रीय सुपरस्टार जेसन डेरुलोसोबत दिसणार आहे.

Read More