Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमची लायकीच नाही बाबासाहेब...; महामानवाच्या जयंतीला अभिनेत्रीची बोचरी पोस्ट

आजच्या घडीला त्यांचे विचार अंमलात आणणारे किती?

आमची लायकीच नाही बाबासाहेब...; महामानवाच्या जयंतीला अभिनेत्रीची बोचरी पोस्ट

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शासकीय आणि निमशासकीय पातळीवर विविध कार्यक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. (Dr. Babasaheb Ambedkar )

आंबेडकरी विचारांकडे आजच्या क्षणाला सर्वजण मोठा वैचारिक साठा म्हणून पाहत आहेत. पण, आजच्या घडीला त्यांचे विचार अंमलात आणणारे किती; हा प्रश्न राहून राहून विचारावासा वाटतो. 

समाजाला एका वेगळ्या आणि समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी बाबासाहेबांहेब झटले, पण या समाजानं त्याची कशी परकतफेड केली हे पाहताना मात्र आपण व्यक्ती आणि समाज म्हणून किती अपयशी ठरलो आहोत याची जाणीव झाली. 

एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीनं या महामानवाच्या जयंतीनिमित्तानं सोशल मीडिया पोस्ट लिहिली. यामध्ये तिनं बाबासाहेबांची मनापासून माफी मागितली आहे. 

'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!', असं लिहिणारी ही अभिनेत्री आहे, हेमांगी कवी. 

महामानवाचे विचार जगण्यात आपण कमी पडल्याची खंत तिच्या या पोस्टमधून स्पष्टपणे व्यक्त झाली. ज्य़ानंतर अनेकांनीच तिच्या पोस्टवर व्यक्त होण्यास आणि त्यांची मतं मांडण्यास सुरुवात केली. 

सोशल मीडियावर कायमच मोकळेपणानं व्यक्त होणाऱ्या हेमांगीची ही पोस्ट क्षणोक्षणी आपल्याला विचार करायला भाग पाडत आहे. तिच्या या मतावर तुमचं काय म्हणणं ? 

Read More