Marathi News> मनोरंजन
Advertisement

'डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत' अभिनेत्री मीरा जोशीच्या वक्तव्याने खळबळ

'अगंबाई अरेच्चा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मीरा ओळखली जाते. त्याचबरोबर झी मराठीवरील मालिका तुझं माझं ब्रेकअपमधून ती घरा-घरात पोहचली. मिरा डान्सचे शोदेखील घेते. मीराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच मिरा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 

'डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत' अभिनेत्री मीरा जोशीच्या वक्तव्याने खळबळ

मुंबई : असे अनेक कलाकार आहेत. जे अभिनयासोबतच डान्सही करतात. अमृता खानविलकर, क्रांती रेडकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक या यादीत असे अनेक कलाकार आहेत. ज्यांचा या यादीत समावेश आहे. मात्र अशाच एका अभिनेत्रीने याचीच खंत व्यक्त केलीये. या अभिनेत्रीचं नावं मिरा जोशी आहे. जी अभिनयासोबतच तिच्या डान्समुळेही प्रसिद्ध आहे. नुकतीच मीराने एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. डान्सर असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीत प्रमुख भूमिका मिळत नसल्याचा दावा तिने या मुलाखतीत केला आहे.

'अगंबाई अरेच्चा 2' या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी मीरा ओळखली जाते. त्याचबरोबर झी मराठीवरील मालिका तुझं माझं ब्रेकअपमधून ती घरा-घरात पोहचली. मिरा डान्सचे शोदेखील घेते. मीराचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. नुकतीच मिरा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 

या मुलाखतीत मीराला प्रश्न विचारण्यात आला की, 'तू आयटम साँग केले आहेस, तू स्टेज शो करतेस आणि आता तू अभिनय करतेस. जेव्हा तू एखाद्या सेटवर जातेस तेव्हा एक डान्सर म्हणून एका वेगळ्या पद्धतीनं बघितलं जात का?' यावर मीरा जोशी म्हणाली की, ''कास्टिंग होताना कशाप्रकारे विचार केला जातो हे सांगते. मी एक डान्सर आहे. तर ही एक सकारात्मक गोष्ट आहे की, मला डान्सबरोबर अभिनय सुद्धा येतो. या सकारात्मक बाजूचा खरा विचार केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा ९९ टक्के मी पाहिलं आहे, ते पण मराठी इंडस्ट्रीमध्ये हिंदीत नाही. अरे ही तर डान्सर आहे ना, मग हिला आयटम साँग देऊन टाकू या. तुम्हाला कुठल्याही भूमिकेसाठी विचारत घेतलं जात नाही. ती डान्सर आहे म्हणून तिला आयटम साँग लगेच देऊन विषय निपटवायचा, असं केलं जातं.''

''मला असं क्वचित विचारलं गेलं की, तुझ्यासाठी एक आयटम साँगही आहे व भूमिकाही आहे. तू दोन्हीकडे सूट होशील. तुला काय करायला आवडेल? असं मला फक्त एखादं दुसऱ्या माणसानं विचारलं असेल. आयटम गर्ल आहे म्हणून नकारात्मक भूमिका दिली जाते. सकारात्मक भूमिकेसाठी विचारात घेतलं जात नाही. हे मी खूपदा पाहिलं आहे. डान्सर आहे तर आयटम साँग द्या, आयटम साँग करते तर नकारात्मक भूमिका द्या. सकारात्मक, सोज्वळ ज्या आपल्या घरगुती मुली दाखवतात मालिकेत, ज्या प्रमुख भूमिकेत असतात त्याच्यासाठी कोणी विचार करत नाही,'' असं वक्तव्य मीराने या मुलाखतीत केलंय.

Read More