Marathi News> मनोरंजन
Advertisement

संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज

गेल्या शनिवारी 8 ऑगस्ट रोजी, संजय दत्तला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt)  लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संजय दत्तचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये तो आपल्या बहिणींसोबत घरी जात असल्याचं दिसतंय. 

गेल्या शनिवारी 8 ऑगस्ट रोजी, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्तला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात संजय दत्तची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. परंतु ती निगेटिव्ह आली. याबाबतची माहिती स्वत: संजय दत्तनी ट्विट करुन दिली होती. 

fallbacks

दरम्यान, संजय दत्त लवकरच 'सडक 2' आणि 'केजीएफ 2' या दोन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सडक 2'मध्ये संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि पूजा भट्ट यांच्यासह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर 'केजीएफ 2'मध्ये संजय दत्त, अभिनेता यशसह स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच 'केजीएफ2'मधला संजय दत्तचा फर्स्ट लूक समोर आला असून त्याचा खास अंदाज पाहायला मिळतोय. याआधी संजय दत्तला 2019मध्ये आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानीपत'मध्ये अर्जुन कपूर आणि क्रिती सेननसह पाहायला मिळालं होतं.

 

Read More