Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?

bollywood Actor on surgery : सेलिब्रिटी वर्तुळात मागील काही वर्षांपासून सौंदर्याच्या नवनवीन परिभाषा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रींप्रमाणंच अभिनेत्यांसाठीची इथं सौंदर्याचे काही निकष आहेत.   

'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?

Entertainment News : सौंदर्य.... मुळात या सौंदर्याची ठराविक परिभाषा असते हेच मुळात अनेकांना कलाजगतामुळं उमगलं आहे. सौंदर्य म्हणजे वर्ण, सौंदर्य म्हणजे नाकीडोळी रेखीव चेहरा, सुडौल बांधा आणि बरंच काही. सौंदर्य आणि स्त्री हेच समीकरण अनेकांसाठी पाढा गिरवल्याप्रमाणं. पण, प्रत्यक्षात मात्र सौंदर्याच्या या व्याख्येचे निकष पुरुष वर्गाला किंबहुना इतर कोणालाही लागू असतात. एका आघाडीच्या आणि कमाल अभिनेत्यानं कलाजगतातील सौंदर्यासंदर्भातील वेगळा दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवला. 

सौंदर्य आणि सर्जरी यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा अभिनेता आहे, राजकुमार राव. त्यानं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, जिथं अभिनेत्यानं प्लास्टीक सर्जरी केल्याचं अनेक नेटकरी आणि चाहते म्हणाले. अभिनेत्याची हनुवटी आधीपेक्षा जास्त मोठी आणि लांबट दिसत असल्याचं म्हणत त्याच्या चेहऱ्याच्या बदललेल्या आकाराकडे काहींनी लक्ष वेधलं. 

राजकुमारनं मात्र या सर्व गोष्टी आणि चर्चा धुडकवत आपण कोणतीही सर्जरी केली नसल्याचं स्पष्ट केलं. हा फोटो एडिट करण्यात आल्यासारखा वाटतोय असं म्हणत ओघाओघात त्यानं एका मुलाखतीमध्ये कलाजगतातील एक वास्तवही समोर आणलं. (Actor rajkummar rao on surgery)

हेसुद्धा वाचा : मुंबईला टक्कर देताहेत नवी मुंबईतील 'हे' 7 परिसर; इथं घर खरेदीचा विचारही महाग 

हल्ली पापाराझी सगळीकडेच पोहोचू लागल्यामुळं आपण जिथं जाऊ तिथं चांगलेच दिसलो पाहिले यावर कलाकारांना कायम लक्ष द्यावं लागतं. पुरुष कलाकारांवरही असं (चांगलं दिसण्याचं) दडपण असतं का? असा प्रश्न विचारला असता त्या प्रश्नाचं उत्तर देत राजकुमारनं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या. 

'अगदीच दडपण असतं.... मला नाही वाटत की यात काहीही वेगळं असतं. हो पण महिला कलाकारांइतकं वाईट दडपण नसतं, कारण तुमच्या चप्पलविषयी कोणी काही बोलत नाही. पण, हल्लीच माझ्यासोबत असं काहीतरही घडलं. एक चुकीचा अँगल, एक चुकीचा फोटो आणि एक चुकीचा क्षण कॅमेरात कैद होतो आणि लोक गरज नसताना त्याविषयी बोलत राहतात. हे असं केव्हापासून व्हायला लागलं याचा मलाही अंदाज नाही. पण, असं आधी कधीच नव्हतं. हल्ली विमानतळावर जातानाही या साऱ्याचा विचार करावा लागतो आणि हा तणाव अतिशय विचित्र आहे...' असं तो म्हणाला. 

fallbacks

 

राजकुमारनं फिलर्सचा वापर केलेला?

प्लास्टीक सर्जरीला नाकारणाऱ्या राजकुमारनं कैक वर्षांपूर्वी आपल्या दिसण्यावरून अती काळजी करण्याच्या स्वभावामुळं फिलर्सचा वापर केल्याची मात्र कबुली दिली. 'ज्यावेळी कलाजगतामध्ये सुरुवात केली होती तेव्हा माझ्या लूक्ससंदर्भात बरीच चर्चा झाली, अनेकांनीच प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळं जवळपास 8 ते 9 वर्षांपूर्वी मी फिलर्सचा वापर केला होता. हे मी चांगलं दिसण्यासाठी केलं होतं, जेणेकरून माझा चेहरा सुंदर दिसावा', अशी अतिशय महत्त्वाची गोष्टी सर्वांपुढं ठेवताना आपण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच केल्याचंही राजकुमारनं सांगितलं. कलाजगतामध्ये मोकळेपणानं या मुद्द्यावर बोलणारा राजकुमार त्याच्या या खरेपणामुळं जास्तच चर्चेत राहतो ही बाब नाकारता येत नाही. 

Read More