Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋतिकला भेटली इंटरनेट सेंसेशन, ४० लाखाहून अधिक फॉलोअर्स

 आपण या इंडो अमेरिकन गायिकेचे फॅन असल्याचे ऋतिकने यावेळी सांगितले.

 ऋतिकला भेटली इंटरनेट सेंसेशन, ४० लाखाहून अधिक फॉलोअर्स

मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि इंटरनेट सेंसेशन आणि सिंगर विद्या वॉक्स यांची मंगळवारी भेट झाली. आपण स्वत: या इंडो अमेरिकन गायिकेचे फॅन असल्याचे ऋतिकने यावेळी सांगितले. विद्याच खर नाव विद्या अय्यर असून ती इंटरनेटवर विद्या वॉक्स नावाने प्रसिद्ध आहे.  ऋतिकने विद्यासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. विद्या वॉक्स माझ्या घरी आली. मी काय बोलू ? मी स्वत:च त्यांचा मोठा फॅन आहे.म्यूजिकसाठी तुमचे आभार. तुम्हाला आणि शंकरला भेटून आनंद झाला.' अशी पोस्ट ऋतिक रोशनने लिहिली आहे. ऋतिकच्या घरी विद्याने त्याच्याशी गप्पा मारल्या आणि सेल्फीदेखील घेतली.

विद्या आनंदात 

विद्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ऋतिकसोबतचे फोटोदेखील शेयर केले आहेत. 'ऋतिक तुम्ही बेस्ट आहेत. मी विचार देखील करु शकत नाही की मी तुमच्यासोबत वेळ घालवलाय. मी सातव्या आसमानावर आहे.' असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले. विद्या ही इंडियन क्लासिकल म्यूजिक आणि वेस्टर्न पॉप आणि इलेक्ट्रिकल म्यूझिक मिक्स करुन क्रिएटीव्ह आणि आकर्षक संगीत बनविण्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. 

Read More