Marathi News> मनोरंजन
Advertisement

असं काय घडलं की अनुमप खेर आपल्यापेक्षाही कमी वयाच्या दिग्दर्शकापुढे झुकले... Video Viral

आपल्या या लुकनंतर अभिनेते अनुपम खेरही चर्चेत आले आहेत.

 असं काय घडलं की अनुमप खेर आपल्यापेक्षाही कमी वयाच्या दिग्दर्शकापुढे झुकले... Video Viral

Anupam Kher Meeting with S.S. Rajamoauli : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा 'इमर्जेन्सी' या चित्रपटातील लुक नुकताच रिविल झाला आहे. या चित्रपटातून ते जे.पी. नारायण यांची भुमिका करणार आहेत तर अभिनेते श्रेयस तळपदे अटल बिहारी बायपेयी यांची भुमिका करणार आहेत. यंदा आपल्या या लुकनंतर अभिनेते अनुपम खेरही चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात ते चक्क आपल्याही लहान वयाच्या एका दिग्दर्शकाच्या समोर नतमस्तक होताना दिसत आहेत. 

अनुपम खेर यांनी नुकतीच चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांच्या हैदराबाद येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. राजामौली यांनी अनुपम यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ अनुपम खेर यांनी इन्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या भेटी दरम्यान राजामौली यांच्या पत्नीही हजर होत्या. यावेळी अनुपम खेर यांनी राजामौली यांना एक पारंपारिक शाल भेट म्हणून दिली. ही भेट देताना अनुपम यांनी राजामौली यांच्या खांद्यावरून शाल पांघरली आणि त्यानंतर राजमौली यांच्यासमोर उभे राहून अनुमप खेर यांनी त्यांचे हात जोडून आभार मानले आहे.

इन्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले की Dearest #RamaJi and @ssrajamouli! Thank you for your love, warmth and delicious lunch at your place in Hyderabad! I was particularly happy to welcome you in your own house with a traditional shawl wrapping! I love your simplicity and humility. I feel blessed. So much to learn from both of you!!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनुपम खेर आता कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट कंगनाने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनुपम खेर दिवंगत राजकीय नेते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे. गेल्या महिन्यात अनुपमन यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. राजामौली आता लवकरच महेश बाबू यांच्यासह एक चित्रपट करण्याच्या तयारीत आहेत.   

Read More