Marathi News> मनोरंजन
Advertisement

आतापर्यंत Salman Khan ला असं कुणीचं बोललं नसेल ते Bichukale बोलला, एकच खळबळ

रोखून दाखव" असं आव्हान त्याने सलमान खानला दिलं आहे.   

 आतापर्यंत Salman Khan ला असं कुणीचं बोललं नसेल ते Bichukale बोलला, एकच खळबळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि बिग बॉस हे नातं सगळ्यांनाच चांगलंच ठावूक आहे. सलमान गेल्या अनेक वर्षांपासून बिग बॉस हा रिअॅलिटी शो होस्ट करत आला आहे. यावेळी तो अनेक स्पर्धेकांना मार्गदर्शन करताना दिसला आहे. तर कुणीचा चुक असल्यास त्याने त्या सेलिब्रिटींचे कानदेखील धरले आहेत. 

सध्या बिग बॉस हिंदीचा 15वा सीजन सुरु आहे. ज्यांचा ग्रॅण्ड फिनाले पार पडत आहे. अशात या शोमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले याने सलमान खानविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 

सलमान खान या शोमध्ये बिचुकलेवर ओरडला होता. तुला घरातून बाहेर काढेन असं तो लाईव्ह शोमध्ये बोलला होता.

 सलमान म्हणाला होता की, 'तू ज्या भाषेत बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी बोलतोस तसेच तुझ्या कुटुंबाशी ही बोलशील का? पुन्हा जर अशी भाषा मी ऐकली तर तुझे केस ओढून घराबाहेर खेचत आणून मारेन.'

 आता शोमधून बाहेर आलेल्या अभिजीत बिचुकले याने पुण्यात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने सलमान खानबाबत अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. 

आक्रमक वागणे आणि वादग्रस्त वक्तव अभिजीत बिचकुले बिग बॉस 15मध्येही केली आहेत. बिचुकलेच्या वागण्यामुळे सलमान खान संतापला होता, आता बाहेर आल्यावर बिचुकलेने सलमानवर चांगलीच आखपाखड केली

सलमान खानला त्याच्यापेक्षा दुसरे कोणी मोठे झालेलं सहन होत नाही. त्याच्या सारखे 100 जण मी दाराशी उभे करीन आणि माझी गल्ली झाडायला लावीन,' अशी वक्तव्य करत बिचुकलेने करत सलमानसोबतच्या वादाला सुरुवात केली आहे. 

सलमान खान तिथला नोकर आहे. बिग बॉस चालवणारी कंपनीत तो काम करतो. असं म्हणत बिचुकलेने सलमानचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही.

"नवीन प्रोडक्शन हाऊस सुरु करत असून चित्रपट काढणार, रोखून दाखव" असं आव्हान त्याने सलमान खानला दिलं आहे. 

 

Read More