Marathi News> मनोरंजन
Advertisement

Abhijeet Bichukale Accident : अभिनेता अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात

अभिनेता अभिजीत बिचुकलेचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. पुण्याच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं होतं.

Abhijeet Bichukale Accident : अभिनेता अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात

मुंबई : नगरसेवक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक निवडणुकीत स्वतःला ग्रेट समजत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  सतत काहींना काही विधान करून चर्चेत राहणारा बिचुकले यावेळी मात्र त्याच्या विधानामुळे नव्हे तर त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 

अभिनेता अभिजीत बिचुकलेचा पुण्यामध्ये अपघात झाला आहे. पुण्याच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं होतं. मात्र त्याच्यावर उपचार केल्या नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अभिजित साध्या पुण्यातील घरी आहेत. अभिजित हा मुळचा साताऱ्यातील असून तो सध्या व्यवसायानिमित्ताने  पुण्यामध्ये असतो.  बिचुकले यांच्यावार खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती सूचना केल्या आहेत.

बिग बॉसमुळे घरारात पोहचेला अभिजित बिचूकलेचे आतापर्यंत अनेक विधानं चर्चेतदेखील आली आहेत. राष्ट्रपती पदासाठी आपण योग्य आहोत आणि मला महाराष्ट्रातील राजकारण्यांनी पाठिंबा दिल्यास मी या पदासाठी निवडून येईल अशी आशा त्याने व्यक्त केली होती मध्यंतरी अभिनेता शाहरुख खानने माझी स्टाईल फॉलो केली, असं विधान केलं होतं. त्यानंतर शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. अशा अनेक केलेल्या विधानामुळे तो कायम चर्चेत असतो आणि सोशल मीडियावर ट्रोलही होतो. 

fallbacks

बिचूकलेच्या झालेल्या अपघाता विषयी बोलताना तो म्हणाला की,  ''माझा किरकोळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात मला गंभीर दुखापत झाली नाही.  मी एकदम बरा आहे. खासगी डॉक्टरांच्या सल्ल्याने माझ्यावर उपचार सुरु आहे. माझ्या अपघाताबाबतीत काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या मात्र तसं काहीही नाही आहे. येत्या काही दिवसातच मी ठणठणीत बरा होऊन पुन्हा समाजकार्यासाठी सक्रिय होणार आहे, असं अभिजित बिचूकलेने सांगितलं आहे. 

Read More