Marathi News> मनोरंजन
Advertisement

अभिजीत बिचुकलेची जीभ घसरली; अभिनेत्रीला म्हणतो 'तेरी पप्पी XXX कर के लुँगा'

वागण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या

अभिजीत बिचुकलेची जीभ घसरली; अभिनेत्रीला म्हणतो 'तेरी पप्पी XXX कर के लुँगा'

मुंबई : 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15)  या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या अंतिम फेरीसाठी आता अवघे 4 आठवडे उरले आहेत. असं असतानाच आता या बिग बॉसच्या घरात असणाऱ्या सेलिब्रिटी स्पर्धकांनी त्यांचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. 

सलमाननं शाळा घेतल्यानंतर आतापर्यंत अनेक स्पर्धकांच्या डोळ्यावरचं झापड उडालं आहे. पण, अभिजीत बिचुकले मात्र याला अपवाद ठरत आहे. 

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिच्यासोबत बिचुकलेची चांगली मैत्री आहे. घरातील अनेक मंडळी त्यांना 'दादा' म्हणून हाक मारतात. पण, हल्लीच त्यांनी वागण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. 

शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हिडीओ पोस्ट करत वाहिनीकडून याचीच झलक दाखवण्यात आली आहे. 

प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार तो देवोलिनाचे गाल खेलचाना दिसत आहे. 'तेरे लिए कुछ भी कर जाऊंगा मैं, पप्पी लेंगा तुझे मै... ', असं तो म्हणताना दिसत आहे. 

अभिजीतच्या अशा विचित्र वागण्यावर देवोलिना प्रचंड संतापली असल्याचं पाहायला मिळत आहे. स्वत:च्या मर्यादेत राहा, असा इशाराही तिनं त्याला दिला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत आलास तर माझ्याहून वाईट कोणच नसेल, अशा शब्दांत ती त्याला रागे भरताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील इतरही मंडळी बिचुकलेवर प्रचंड संतापलेले दिसत आहेत. 

एका टास्कदरम्यान हा सर्व प्रका झाला आणि त्याला चुकीच्या पद्धतीने वाव मिळाला ज्यामुळं आता हे प्रकरण बरंच पेटताना दिसत आहे. 

Read More