Marathi News> मनोरंजन
Advertisement

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडणार होता मोठा अनर्थ; चाहत्यांना दिला सतर्क राहण्याचा इशारा

अभिनेत्री अपूर्वा चौधरी एका मोठ्या फसवणुकीला बळी पडणार होती. जर अभिनेत्री वेळीच सतर्क राहिली नसती तर तिचं मोठं नुकसान झालं असतं.

मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडणार होता मोठा अनर्थ; चाहत्यांना दिला सतर्क राहण्याचा इशारा

मुंबई : सोशल मीडियाचा होणारा अतिरेकी वापर , त्यात लोकांना फसवण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या या सर्व गोष्टींमुळे वापरकर्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. सोशल मीडिया मार्फत पैसे कमावण्याच्या संधी लोकांना दिल्या जातात. मात्र बरेचदा या संधीचा गैरवापर होत युजर्सना तोटा सहन करावा लागतो. नुकताच  कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी मालिकेत काम करणारी अभिनेत्री अपूर्वा चौधरी एका मोठ्या फसवणुकीला बळी पडणार होती. जर अभिनेत्री वेळीच सतर्क राहिली नसती तर तिचं मोठं नुकसान झालं असतं. यासंदर्भातला व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जाणून घेवूया संपुर्ण प्रकरण
''तुम्ही जर अभिनेता अभिनेत्री असाल किंवा इन्फ्लुएन्सर असाल आणि तुम्ही कोलॅब्रेशन किंवा पेड कोलॅब्रेशन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. साक्षी कसबे नावाची माझी कॉस्च्युम डिझायनर आहे. तिच्याच Instagram वरून मला, आमच्या कंपनीसोबत तुम्ही पेड कोलॅब्रेशन कराल का ? असा मेसेज आला होता ‌. त्यावर मी ओके म्हटलं. याआधी मी असं केलं आहे. तिने मला समोरून माय प्लीज पेजची लिंक पाठवली. त्या पेजवरील ज्या कोणत्या स्टोरी तुम्हाला आवडतील त्या तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीवर २४ तास ठेवा असं मला सांगण्यात आलं. मी तसा केलं त्यानंतर माझ्याकडे स्कॅनर मागितला गेला.''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ''खरंतर माझा नंबर तिच्याकडे होता, ती माझ्या ओळखीची होती त्यामुळेच मी विश्वास ठेवून तिला माझा स्कॅनर पाठवला. एक चांगली मोठी रक्कम टाकून तिने फोन पे चा एक स्क्रीन शॉट मला पाठवला. 'तुमची माहिती कंपनीकडे पोहोचली आहे तेव्हा फक्त व्हेरिफिकेशन करता ‘तुम्ही तुमच्या प्रायव्हेट अकाउंटच्या इमेल आयडीच्या जागी आमचा इमेल आयडी टाका'. तेव्हा मला याबद्दल शंका आली. त्यांचा इमेल आयडी टाकून माझं व्हेरिफिकेशन कसं काय होईल?

पुढे अभिनेत्री म्हणाली, मी त्यांना मनातली शंका विचारली तेव्हा त्यांनी मला काही स्क्रीनशॉटचे पुरावे दाखवले की या या लोकांनी असं केलं आहे त्यांना आम्ही पैसे दिले आहेत. माणुसकीवर विश्वास ठेवा, सगळ्या गोष्टी खोट्या नसतात असे मेसेज मला आले. पण हे फ्रॉड असल्याची शंका मनात आली. मी त्यांना ओकेचा मेसेज केला. त्यानंतर मी स्टोरीज डिलीट केल्या आणि साक्षी कसबेच्या नंबरवर फोन केला. तिने आधी फोन उचलला नाही पण थोड्या वेळात तिचाच फोन आला. तिने मला सांगितलं की ताई माझं अकाउंट हॅक झालंय. या फ्रॉडची तिने स्टोरी ठेवली होती पण ती लोकांपर्यंत पोहोचली नाही म्हणून मग तिनेही मला या फ्रॉडबद्दल सगळ्यांना जागरूक करण्यास सांगितलं.''

Read More