Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावरील कनिष्काचे ठुमके युट्यूबवर व्हायरल!

सोशल मीडियात कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही.

VIDEO : सपना चौधरीच्या गाण्यावरील कनिष्काचे ठुमके युट्यूबवर व्हायरल!

नवी दिल्ली - सोशल मीडियात कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कधी एखाद्याने सहज म्हणून केलेली एखादी कृती वाऱ्यासारखी सोशल मीडियामध्ये पसरते आणि धम्माल उडवून जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आपल्या अंगातील कला सगळ्या जगासमोर घेऊन जाण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्वतःतील एखादी कला दाखवण्यासाठी आता कोणत्या मोठ्या व्यासपीठाची गरज उरली नाही. कधी कधी ज्यांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला जगापुढे घेऊन जातात. असाच एक व्हिडिओ सध्या युट्यूबवर मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे. 

हरियाणातील डान्सर सपना चौधरी आधीपासून प्रसिद्ध होतीच. पण बिग बॉसमधील प्रवेशानंतर तिच्या प्रसिद्धीमध्ये कमालीची वाढ झाली. तिच्या चाहत्यांची संख्या अनेकपटीने वाढली. त्यामुळे अनेक मुली सपना चौधरी हिचे गाजत असलेले गाणे  'तेरी आंख्या का यो काजल' वर डान्स स्टेप करू लागल्या आणि युट्यूबवर प्रसिद्ध करू लागल्या. कनिष्का नावाच्या एका मुलीने याच गाण्यावर केलेला एक व्हिडिओ सध्या जबरदस्त प्रसिद्ध झाला आहे. १७ लाखांहून जास्तवेळा हा व्हिडिओ युट्यूबवर बघितला गेला आहे. या व्हिडिओला Kanishka Talent Hub नावाच्या एका युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १७,५४,३८३ वेळा बघितले गेले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.

व्हिडिओमध्ये परफॉर्म करणारी कनिष्का ही मुलगी सपना चौधरीच्या  'तेरी आंख्या का यो काजल'च्या स्टेपनुसार डान्स करताना दिसते आहे. कनिष्काची नाचण्यातील उर्जा आणि डान्स स्टेप्समुळे हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, तो खूप जणांकडून बघितला गेला आहे.

Read More