Marathi News> मनोरंजन
Advertisement

मॉलमध्ये हिना खानसोबत असभ्य वर्तन, VIDEO झाला व्हायरल

'बिग बॉस ११'ची स्पर्धक हिना खान वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये दाखल झाली. मात्र, यावेळी तिच्यासोबत एका चाहत्याने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. 

मॉलमध्ये हिना खानसोबत असभ्य वर्तन, VIDEO झाला व्हायरल

मुंबई : 'बिग बॉस ११'ची स्पर्धक हिना खान वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये दाखल झाली. मात्र, यावेळी तिच्यासोबत एका चाहत्याने असभ्य वर्तन केल्याचं समोर आलं आहे. 

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

'बिग बॉस ११'च्या घरात झालेल्या गोंधळ आणि वादानंतर या आठवड्यात नॉमिनेट झालेले चार स्पर्धक घराबाहेर जावून लाईव्ह वोटिंग करताना दिसले. यामध्ये हिना खान, शिल्पा शिंदे, विकास गुप्ता आणि लव त्यागी यांचा समावेश आहे.

या चारही स्पर्धकांची वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये एन्ट्री होताच तेथील दृश्य पाहण्यासारखे होते. मात्र, त्याच दरम्यान मॉलमध्ये असा काही प्रकार घडला ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

मॉलमध्ये उपस्थित एका चाहत्याने असभ्य वर्तन केलं आहे. चाहत्यांच्या गर्दीतील एका व्यक्तीने हिना खानचे केस मागून खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हिना खान जोराने किंचाळताना दिसली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करण्यात आला असून तो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिनाचे चाहते खूपच रागात आहेत. चाहते आपला राग ट्विटरवर व्यक्त करत आहेत. 

Read More