Marathi News> मनोरंजन
Advertisement

सुशांत आत्महत्या संबंधित १० अफवा; जाणून घ्या सत्य घटना

सुशांतने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आपलं जीवन संपवलं.

सुशांत आत्महत्या संबंधित १० अफवा;  जाणून घ्या सत्य घटना

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे आहे. सोबतच ईडीकडून देखील चौकशी सुरूच  आहे. यापूर्वी सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस तपास करत होते. त्याच्या आत्महत्येनंतर अनेक अफवा पसरल्या होत्या. आता त्यामागील रहस्य समोर आलं आहे. 

१. सुशांतने मृत्यूपूर्वी पार्टी केली होती. 
सत्य - मुंबई पोलिस आयुक्त त्याचप्रमाणे सुशांतचा मित्र सिद्धर्थ पिठानीने देखील १३ जून रोजी सुशांतच्या घरी कोणत्याही प्रकारची पार्टी न झाल्यचं स्पष्ट केलं आहे. मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांनी केलेल्या चौकशीमध्ये देखील यासंबंधी कोणत्याही प्रकारचं तथ्य समोर आलेलं नाही.

२. एका राजकीय पक्षाचा तरुण नेता देखील या पार्टीमध्ये उपस्थित होता. या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पार्टीत उपस्थित असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
सत्य - १३ जून रोजी सुशांतच्या घरात पार्टी झालीच नाही तर कोणी सुशांतच्या घरी येण्याचा प्रश्नचं उपस्थित राहू शकत नाही. या प्रकरणी खुद्द आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

३. १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी दोन रुग्णवाहिका बदलण्यामागे एक रहस्य आहे.
सत्य - सुशांतच्या घरी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचर व्हीलमध्ये काही समस्या असल्यामुळे त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेत बसत नव्हता त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका तात्काळ बोलावण्यात आली होती . याचा खुलासा चक्क रुग्णवाहिका चालकाने केला.

४. १४ जून रोजी घराबाहेर पडल्यानंतर सुशांतचा मृतदेह एका रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. 
सत्य - यावेळी झी मीडियाची टीम घरापासून ते रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेसोबतच होती. त्यामुळे असा कोणताही प्रकार दरम्यान घडला नाही.

५. दिशा सॅलियन आत्महत्येपूर्वी झालेल्या पार्टीत रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीही होता.
सत्य - दिशा सालियान तिच्या होणाऱ्या पती  रोहन रायसोबत शालेय मित्रांसह मालाड परिसरातील त्यांच्या घरी पार्टी करण्यासाठी गेली होती. ही तिच्या वाढदिवसाची पार्टी होती. यामध्ये फक्त ६ जण होते. मात्र पार्टीमध्ये शौविक चक्रवर्ती, राजकीय नेता आणि बड्या कलाकारांचा समावेश नव्हता. 

६. दिशा गरोदर होती. 
सत्य - याबद्दल अद्याप कोणतही सत्य समोर आलेलं नाही. शिवाय मुंबई आणि बिहार पोलिसांना तपासा दरम्यान कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.

७. दिशा सालियनने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केला होता.
सत्य - याबद्दल अद्याप कोणतही सत्य समोर आलेलं नाही. शिवाय मुंबई आणि बिहार पोलिसांना तपासा दरम्यान कोणताही पुरावा हाती लागलेला नाही.

८. दिशा सालियनचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला.
सत्य - ज्यावेळी दिशाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला तेव्हा ती नग्न अवस्थेत नव्हती. तिच्या अंगावर कपडे  होते. तिचे फोटो तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत.

९. दिशाच्या  मृत्यूच्या दोन दिवसानंतर ११ जून रोजी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन का केले.
सत्य - कारण सर्वप्रथम तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले. 

१०. दिशा सलीयन मृत्यूची तपासणी मालवणी पोलिसांकडून चारकोप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सत्य - दिशाच्या आत्महत्येची तपासणी अद्यापही मालवणी पोलीस करत आहेत. 

Read More