Marathi News> शिक्षण
Advertisement

तरुणांसाठी आनंदाची बातमी, SBI मध्ये विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

तरुणांसाठी आनंदाची बातमी, SBI मध्ये विविध पदांसाठी भरती

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

एसबीआय (SBI) मध्ये विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी आणि किती जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

पद : एचआर स्पेशालिस्ट 

एकुण जागा : १ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीएसह एचआर / पीजीडीएममध्ये स्पेशलायझेशन आणि ७ ते १० वर्षाचा अनुभव 

वयोमर्यादा : ३२ ते ३५ वर्षे 

 

पद : एचआर स्पेशालिस्ट (मनुष्यबळ नियोजन) 

एकुण जागा : १ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीएसह एचआर / पीजीडीएममध्ये स्पेशलायझेशन आणि ७ ते १० वर्षाचा अनुभव 

वयोमर्यादा : ३२ ते ३५ वर्षे

 

पद : इंटर्नल कम्युनिकेशन स्पेशालिस्ट 

एकुण जागा : १ जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीए किंवा मार्केटिंग / मास मीडिया / फायनान्स / कॉमर्स पदव्युत्तर पदवी आणि ५ ते ९ वर्षाचा अनुभव 

वयोमर्यादा : २७ ते ३५ वर्षे

 

पद : बॅंकिंग सुपरवायझरी स्पेशालिस्ट (BSS)

एकुण जागा : ३ जागा

शैक्षणिक पात्रता : २० ते २५ वर्षाचा अनुभव 

वयोमर्यादा : ५५ ते ६५ वर्षे

 

पद : संरक्षण बॅंकिंग सल्लागार (लष्कर) 

एकुण जागा : १ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (Lieutenant General)

वयोमर्यादा : अधिकाधिक ६२ वर्षे

 

पद : संरक्षण बॅंकिंग सल्लागार (निमलष्करी दल) 

एकुण जागा : १ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (भारतीय पोलीस सेवा, केंद्रीय राखीव पोलीस दलात ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : अधिकाधिक ६२ वर्षे


पद : सर्कल संरक्षण बॅंकिंग सल्लागार

एकुण जागा : ५ जागा

शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त (Major General or Brigadier)

वयोमर्यादा : अधिकाधिक ६० वर्षे

 

नोकरीचं ठिकाण : मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ

 

इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०१८ आहे.

या संदर्भातील अधिक माहिती इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/1526299849420_SBI_SCO_English.pdf या संकेतस्थळावर पहायला मिळेल.

अर्ज करण्यासाठी http://ibps.sifyitest.com/sbiscormay18/ या लिकंवर क्लिक करा.

Read More