Marathi News> शिक्षण
Advertisement

राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. 

राज्यातील बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, येथे पाहा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. दरम्यान, या निकालाचा टक्का घसल्याचे दिसून येत आहे.  १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २२. ६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.  

बारावीच्या मार्चमधील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी देण्यासाठी १७ जुलै ते ४ ऑगस्ट या दरम्यान राज्यभरात फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यंदा लातूर विभागातील सर्वाधिक म्हणजेच ३१. ४८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जुलै २०१७ मधील फेरपरीक्षेची टक्केवारी २४. ९६ आणि २०१६ मध्ये २७.० ३ टक्के होती.

निकाल कुठे पाहणार ?

निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. गुणपडताळणीसाठी २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल. या अर्जासोबत निकालाची छायाप्रत जोडणे बंधनकारक आहे.

Read More