Marathi News> शिक्षण
Advertisement

अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री

 अकरावी प्रवेशातल्या शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री लावण्यात आली आहे. 

अकरावी प्रवेश : शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री

मुंबई : अकरावी प्रवेशातल्या शाळासंलग्न संस्थांच्या प्रवेश कोट्याला कात्री लावण्यात आली आहे. २० टक्क्यांचा कोटा आता १० टक्क्यांवर आणला आहे. झी २४ तासनं मात्र या आरक्षणाला कात्री लागल्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केले आहे. कारण शाळासंलग्न महाविद्यालयांमध्ये भरपूर जागा आहेत. त्यामुळे प्रवेशाची भीती बाळगू नये असंही त्यांनी सांगितले आहे. 

शाळासंलग्न महाविद्यालयांचे आरक्षण २० टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीय. संस्थाचालकांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. शाळासंलग्न महाविद्यालयांमध्ये आरक्षणाची मर्यादा १०३ टक्क्यांपर्यंत गेल्याचं वृत्त 'झी २४ तास'ने दिल्यानंतर सरकारने तातडीने हालचाली करत हा निर्णय घेतला आहे. 

Read More